महाराष्ट्र

Lok Sabha Election : भाऊ तुमच्या जाहिरनाम्यात अस क़ाय जी!

Bhandara Gondia Constituency- मतदारात जाहरनाम्याची उत्सुकता..

Political activities : भंडारा- गोंदिया लोकसभा मतदारसंघात रिंगणातील उमेदवार जाहीर होऊन उमेदवार कामीही लागले. 1 एप्रिलचा मुहूर्त साधून बहुतेक उमेदवारांनी प्रचाराचा नारळही फोडला आहे; मात्र राष्ट्रीय पक्षांसह अन्य कुण्याही उमेदवारांकडून जाहीरनामा न आल्याने भाऊ तुमच्या जाहिरनाम्यात अस क़ाय जी असा प्रश्न विचारुन या मतदारसंघातील जनतेसाठी भावी खासदार काय करणार, असा सवाल मतदार विचारत आहेत.

शोधला जातोय जुना जाहीरनामा

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून भाजपचे विद्यमान खासदार सुनील मेंढे पुन्हा रिंगणात आहेत. मागील टर्मला त्यांनी जनतेपुढे दिलेल्या जाहीरनाम्यातील आश्वासने काय होती, ती आता जनता शोधायला लागली आहे. भंडारा शहराला वायफाय सिटी बनविणे, जिल्ह्याला मेट्रोने नागपूरशी जोडणे यांसह अनेक आश्वासने आता मतदारांना आठवायला लागली आहेत. मेंढे यांच्याकडून निवडणुकीची संपूर्ण तयारी केव्हाच झाली आहे. जनतेपुढे जाहीरनामा काय द्यायचा, याचेही नियोजन असले तरी, अद्याप तो मांडलेला मात्र नाही. दुसरीकडे महाआघाडीने काँग्रेसचे तरुण उमेदवार डॉ. प्रशांत पडोळे यांना मैदानात उतरविले आहे. भाजपच्या तुलनेत या नव्या उमेदवाराची यंत्रणा काहीशी अपूर्ण दिसत असली, तरी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कमान आपल्या हाती राखली आहे. त्यामुळे ते नियोजन करतील, असा कार्यकर्त्यांना विश्वास आहे. पडोळे यांनी प्रचाराचा नारळ 1 एप्रिलपासून फोडला असला, तरी त्यांचाही जाहीरनामा आलेला नाही. पक्षाचा जाहीरनामा तयार असून तो प्रकाशित करण्यासाठी 6 एप्रिलचा मुहूर्त ठरला होता. स्थानिक उमेदवाराचाही जाहीरनामा प्रकाशित करण्याचे नियोजन होते,मात्र तो मुहूर्त पुढे ढकलला आहे.

Lok Sabha Election : भंडारा-गोंदिया लोकसभेत उमेदवारांपेक्षा नेत्यांची प्रतिष्ठा पणाला!

मानव विकास निर्देशांकात या जिल्ह्यातील जनता समाधानी असल्याची नोंद आहे. असे असले तरी भंडारा जिल्ह्याला विकासाची आस आहे. महामार्गांचे जाळे असूनही मोठे उद्योग नाहीत. नवे उद्योग येण्यास तयार नाहीत. त्यासाठी जनप्रतिनिधींकडून म्हणावे तसे प्रयत्न नाहीत. गोसेखुर्द प्रकल्प देशात प्रख्यात असला तरी प्रत्यक्षात भंडारातील पवनी, लाखांदूर वगळता अन्य तालुके व गोंदिया जिल्ह्याला त्याचा लाभ नाही.मासेमारीचा व्यवसाय बुडालेला आहे. तलावांचा हा जिल्हा गाळात फसला आहे, बेरोजगारांच्या हातांना काम नाही, कृषीवर आधारित अर्थव्यवस्था असली तरी त्यासंबंधित प्रक्रिया उद्योग नाहीत.या सर्व समस्यांचा गुंता सोडविणारा जनप्रतिनिधी जनतेला हवा आहे. केवळ आश्वासन देणारा नको, तर काम खेचून आणणाऱ्या खासदाराचा मतदारांना शोध आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!