Buldhana News : राज्यातील लोकसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र राज्याकरिता नियुक्त केलेले विशेष निवडणूक निरीक्षक सेंथिल क्रिष्णा यांनी प्रसार माध्यम कार्यालयातर्फे करण्यात येत असलेल्या कामकाजाचा आढावा घेत तसेच नागरिकांना काही सूचना किंवा तक्रारी असल्यास संपर्क साधावा असे आवाहन देखील निवडणूक निरीक्षकांनी केले आहे.
महाराष्ट्रामध्ये ४८ लोकसभा मतदारसंघासाठी एकूण पाच टप्प्यांमध्ये सुरू असलेली तयारी, निवडणुकीचे कामकाज पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी उपलब्ध मनुष्यबळ, निवडणुकीच्या कालावधीत आचारसंहितेचे पालन, कायदा व सुव्यवस्था, मतदार जनजागृतीसाठी राबविण्यात येणारे उपक्रम, निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासन सज्ज असून सर्व तयारीची माहिती यावेळी निवडणूक निरीक्षक सेंथिल क्रिष्णा यांनी माहिती दिली.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने दि. 16 मार्च 2024 रोजी प्रसिद्ध केला आहे. त्यासाठी बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी दुसऱ्या टप्प्यामध्ये दि. 26 एप्रिल 2024 रोजी मतदान घेण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाकडून बुलढाणा लोकसभा मतदारसंघ करिता निवडणूक निरिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.या निवडणुकीसाठी निवडणूक निरीक्षक सर्वसाधारण म्हणून पी. जे.भागदेव यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचा संपर्क क्रमांक 7385976149 हा आहे. त्यांचे संपर्क अधिकारी म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता तुषार मेतकर, संपर्क 9860823637 हे आहेत. निरीक्षक यांचे निवासस्थान सावित्री, शासकीय विश्राम गृह, बुलडाणा येथे आहे. तर निवडणूक निरीक्षक कायदा व सुव्यवस्था म्हणून सेनथील क्रिष्णा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा संपर्क क्रमांक 8421797614 हा आहे. त्यांचे संपर्क अधिकारी म्हणून सहायक पोलिस निरीक्षक श्रीधर घुट्टे 9850394342 हे आहेत. निरीक्षक यांचे निवासस्थान अजिंठा, शासकीय विश्राम गृह, बुलडाणा येथे आहे. निवडणूक निरिक्षक खर्च म्हणून अमित शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा संपर्क क्रमांक 8625976378 असा आहे. त्यांचे संपर्क अधिकारी जिल्हा कोषागार अधिकारी ऋषिकेश वाघमारे 8668805727 हे आहेत. निरीक्षक यांचे निवासस्थान जिजाऊ, शासकीय विश्रामगृह, बुलडाणा येथे आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी तीनही निरीक्षक जिल्ह्यामध्ये दाखल झाले आहेत. कोणत्याही राजकीय पक्षांची, उमेदवारांची, नागरीकांची काही तक्रार असल्यास निरीक्षकांच्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधता येईल, निवडणूक विभागाने दिलेल्या नियमानुसार बुलढाणा लोकसभेमध्ये नियमाचे पालन केले जात आहे की नाही तसेच कशा पद्धतीने काम केले जात आहे. या संदर्भाचा आढावा आज निवडणूक निरीक्षक सेंथिल क्रिष्णा यांनी बुलढाणा येथे घेतला आहे.. तसेच नागरिकांना काही सूचना किंवा तक्रारी असल्यास संपर्क साधावा असे आवाहन देखील निवडणूक निरीक्षकांनी केले आहे.