महाराष्ट्र

Lok Sabha Election : त्या दोन समर्थकांवर अखेर गुन्हा दाखल

Buldhana Constituency : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात घातला होता धिंगाणा..

Code of Conduct : बुलढाणा लोकसभेसाठी महायुतीकडून खासदार प्रतापराव जाधव यांनी २ एप्रिलला अर्ज दाखल केला. अर्ज दाखल केल्यानंतर शहरात जंगी रॅली सुद्धा काढण्यात आली.. दरम्यान खासदार प्रतापराव जाधवांच्या दोन दारुड्या समर्थकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात येऊन पोलिसंसोरच धिंगाणा घातला… नागेश गोविंदराव सोनुने आणि विनोद गजानन चांदणे अशी दोघांची नावे आहेत. या दोघांविरुद्ध बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.. दोघांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात प्रतापराव जाधवच येणार, कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला, अश्या घोषणा दिल्या. अशा पद्धतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात उमेदवाराच्या नावाची घोषणा करणे म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन होय.

बुलढाणा लोकसभेसाठी महायुतीकडून खा.जाधव उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर शहरात रॅली काढण्यात आली. त्यानंतर जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात महायुतीची भव्य सभा पार पडली. दरम्यान खासदार प्रतापराव जाधवांच्या दोन समर्थकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात घोषणाबाजी केली. या प्रकरणात नागेश सोनुने, विनोद चांदणे यांच्या विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलिस कॉन्स्टेबल उमेश घुबे यांनी शहर ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात नागेश सोनुने, व विनोद चांदणे या दोघांनी प्रतापराव जाधवच येणार, कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला अशा घोषणा दिल्या. अशा पद्धतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात उमेदवाराच्या नावाची घोषणा करणे म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन होय. असे तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!