महाराष्ट्र

Lok Sabha Election : लोकवर्गणीतून विधानसभा लढणारे  आता झालेत कोट्याधीश  

Increase in Wealth : संजय गायकवाड यांच्या चाल, अचल संपत्तीत वाढ 

Buldhana Constituency : आमदार संजय गायकवाड यांनी लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यात निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या शपथपत्रात त्यांनी चल, अचल संपत्ती, आपल्यावरील गुन्हे, इन्कम टॅक्स संदर्भात माहिती दिली आहे. आमदार संजय गायकवाड यांनी 2019 मध्ये सुद्धा विधानसभेच्या वेळी शपथपत्र दाखल केले होते. त्यावेळी लोकवर्गणीतून विधानसभा लढणारे संजय गायकवाड हे आता कोट्याधीश झाले आहे. त्यांच्या संपत्तीत संपत्तीत तिप्पट वाढ झाली आहे. 

2019 ची विधानसभा निवडणूकरीत संजय गायकवाड यांनी बुलढाणा विधानसभेतून आपली उमेदवारी दाखल केली होती. शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यावेळेस त्यांनी लोकवर्गणीतून अर्ज दाखल केल्याचे नमूद केले होते. मात्र आता साडेचार वर्षात आमदार संजय गायकवाड 5.55 कोटी रुपयांचे मालक झाले आहेत. यातील मोठा वाटा त्यांना वडिलोपार्जित वारसा, हक्काने मिळालेली शेती आणि त्या शेतीत करण्यात आलेल्या प्लॉटिंगचे बाजारभावानुसार किंमत 1 कोटी 23 लाख रूपये आहे. तसेच त्यांना आमदार म्हणून दरमहा मिळणारे 1 लाख 86 हजार रुपयांचे वेतन यामुळे त्यांच्या संपत्तीत वाढ झाल्याचे दिसून येते. याशिवाय शेती हे उत्पन्नाचे साधन असल्याचे आमदार गायकवाड यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रात म्हटले आहे. आमदार गायकवाड यांचे मोठे सुपुत्र मृत्यूंजय गायकवाड यांची संपत्ती सुद्धा एकूण 1 कोटी 11 लाख 61 हजार 104 रुपये आहे. त्यांचाही व्यवसाय शेती असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

आमदार संजय गायकवाड यांची 2019 मध्ये 1 कोटी 63 लाख रुपये संपत्ती होती आणि त्यांच्यावर 39 लाख रुपयांचे कर्ज होते. हजारो कोटी रूपयांची विकासकामे बुलढाणा मतदारसंघात आणणारे आमदार संजय गायकवाड केवळ साडे पाच कोटींचेच मालक कसे? असा प्रश्न कुणालाही पडला असेल. 2014 मध्ये जेव्हा त्यांनी मनसेकडून उमेदवारी दाखल केली होती, तेव्हा त्यांच्याकडे केवळ 15 लाख रुपयांची संपत्ती होती. त्यातही 14 लाख रुपयांचे बुलढाणा अर्बनचे कर्ज होते. आज रोजी त्यांच्यावर 21 लाख रुपयांचे वाहन कर्ज आहे.

Lok Sabha Election : प्रतापराव राहिले बाजूला गायकवाडांनी भरला अर्ज

आमदार संजय गायकवाड यांनी दोन दिवसांपूर्वी लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यात नियमानुसार त्यांनी शपथपत्रही दाखल केले. त्यात चल, अचल संपत्ती, गुन्हे, इन्कम टॅक्स संदर्भात माहिती द्यावी लागत असते. आमदार संजय गायकवाड यांनी 2019 मध्ये सुद्धा विधानसभावेळी शपथपत्र दाखल केले होते. मागील पाच वर्षांपूर्वीची आणि आताच्या शपथपत्राची तुलना केली असता त्यांच्या संपत्तीत तीन पटीने वाढ झाल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे आमदार गायकवाड यांच्यावर बुलढाणा शहर पोलिसांत दोन गुन्हे दखल असल्याचे सुद्धा शपथपत्रात उल्लेख करण्यात आलाय. तसेच त्यांच्याकडे 16 एकर शेती असल्याचं सुद्धा दाखवण्यात आलं आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!