महाराष्ट्र

Lok Sabha Election : माजी आमदार सपकाळ यांनी तलवार केली म्यान !

U turn : आधी केले ट्विट नंतर म्हणतात मी आघाडी सोबतच...

Buldhana News : लोकसभा निवडणुकीत बुलढाणा मतदारसंघात काँग्रेसचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ व भाजपचे जिल्हा संपर्कप्रमुख तथा माजी आमदार विजयराज शिंदे यांनी बंडखोरीचे संकेत देत बुलढाण्यातील राजकीय अफवांचा बाजार गरम ठेवला आहे. यातील विजयराज शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. व आपण माघार घेणार नसल्याचे काल पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केले दुसरीकडे काँग्रेसचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी मात्र तसे काहीही केले नाही. ट्विटद्वारे बंडाचे निशाण त्यांनी उभारले होते मात्र काल महा विकास आघाडीच्या पार पडलेल्या कार्यक्रमात ते आवर्जून उपस्थित होते आणि आपण महाविकास आघाडी सोबतच असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना जाहीर केले. त्यामुळे हर्षवर्धन सपकाळ यांनी आपली तलवार म्यान केल्याचे दिसून येत आहे. दोन्ही पक्षांतील बेदखल असलेल्या या नेत्यांनी दिलेल्या या ‘हुल’ची त्यांच्या पक्षातील कोणत्याही नेत्याने गांभीर्याने दखल घेतलेली दिसत नाही. त्यामुळे पेल्यातील हे वादळ पेल्यातच शांत होईल, अशी शक्यता राजकीय राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. हा फक्त चर्चेत राहण्यासाठी केलेला प्रपंच असल्याचे अनेकांचे मत आहे.

बुलढाण्याचे काँग्रेसचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी एक ट्विट करून खळबळ उडवून दिली होती. हर्षवर्धन सपकाळ यांनी ट्विट करत म्हटलं होते की, ‘राज्यात अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत तर बुलढाण्यात काय?’ यामुळे महाविकास आघाडीत निवडणुकीच्या तोंडावर बुलढाण्यात काँग्रेसची नाराजी समोर आली. महाविकास आघाडी कडून बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी ठाकरे गटाचे प्रा. नरेंद्र खेडेकर यांना उमेदवारी जाहीर झाली, मात्र प्रा. खेडेकर यांच्या संपर्कात बुलढाण्यातील काँग्रेसचे नेते नसल्याने बुलढाण्यात महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे दिसून आले. त्यात नुकतेच हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या ट्विट मुळे ठाकरे गटाचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुख हे तडकाफडकी बुलढाण्यात दाखल झाले असून त्यांनी जिल्ह्याच्या काँग्रेस कार्यालयात काँग्रेस नेत्यांची मनधरणी केल्याची माहिती पुढे आली.

महाविकास आघाडी मधून बुलढाणा लोकसभा मतदारसंघाची जागा आहे उबाठा शिवसेना गटाला सुटलेली आहे. काँग्रेसने ही जागा आपल्यासाठी मागितली होती मात्र ती मिळाली नाही. काँग्रेसचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यासाठी इच्छुक होते राज्य आणि देशपातळी वरील नेत्यांसोबत चांगले संबंध असल्याचा दावा हर्षवर्धन सपकाळ यांचा असला तरी ते स्वतःसाठी ही जागा मिळवू शकले नाहीत. त्यामुळे हर्षवर्धन सपकाळ यांनी एक ट्विट करून खळबळ उडवून देण्याचा प्रयत्न केला. सपकाळ यांनी ट्विट करत म्हटलं होते की, ‘राज्यात अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत तर बुलढाण्यात काय?’ यामुळे महाविकास आघाडीत निवडणुकीच्या तोंडावर बुलढाण्यात काँग्रेसची नाराजी समोर आली. मात्र हा सर्व प्रपंच दखल घेण्यासाठी होता हा अंदाज द लोकहित ने आधीच व्यक्त केला होता आणि झाले ही तसेच काल बुधवारी बुलढाण्यात पार पडलेल्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यामध्ये हर्षवर्धन सपकाळ यांनी आपण आघाडी धर्म पाळणार असल्याचे सांगितले. आणि आपली तलवार म्यान केली.

दरम्यान आज गुरुवारी महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकर आपला उमेदवारी अर्ज दुपारी दाखल करणार आहे. यावेळेस काँग्रेसचे कोण कोणते नेते उपस्थित राहतील हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!