महाराष्ट्र

Lok Sabha Election : अकोल्यात पुन्हा तिरंगी लढत, वंचित, भाजप आणि काँग्रेसचे उमेदवार झुंजणार !

Akola Constituency : भाजपच्या गडाला खिंडार पाडण्यासाठी ‘मराठा कार्ड’ वापरण्याची रणनीती काँग्रेसने आखली आहे.

Lok Sabha Election : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या अकोला मतदारसंघात अखेर कॉंग्रेसने उमेदवार देऊन ॲड. प्रकाश आंबेडकर यांना आव्हान दिलं आहे. त्यामुळे आता अकोल्यात वंचित बहुजन आघाडी, महाविकास आघाडी आणि महायुती अशी तिहेरी लढत होणार आहे. डॉ. अभय पाटील यांना काँग्रेसकडून काल (ता. 1) उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यामुळे प्रकाश आंबेडकर यांना काँग्रेसचा पाठिंबा मिळण्याची शक्यता मावळली आहे.

Lok Sabha Election : ‘वंचित’ने केली विभागीय आयुक्तांची तक्रार, कारण..

गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातील जागावाटपाचा तिढा कायमच होता. अखेर प्रकाश आंबेडकर यांनी काही मतदारसंघात उमेदवारही जाहीर केले होते. अशातच स्वतः प्रकाश आंबेडकर हे अकोला लोकसभा मतदारसंघात उमेदवार असल्याने या मतदारसंघात काँग्रेस उमेदवार देणार नसल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. अखेर काँग्रेसकडून डॉ. अभय पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्याने या सर्व शक्यतांवर पाणी फिरले आहे. त्यामुळे आता डॉ. अभय पाटील हे उमेदवारी अर्ज भरणार आहेत. काँग्रेसच्या या उमेदवारीने अकोल्यात पुन्हा एकदा तिरंगी लढत होणार आहे.

कोण आहेत डॉ. अभय पाटील?

पश्चिम विदर्भातील नामवंत अस्थिरोगतज्ज्ञ म्हणून ओळख असलेले डॉ. अभय पाटील हे गेल्या अनेक दिवसांपासून अकोला लोकसभा मतदारसंघात प्रचार करीत होते. डॉ अभय पाटील हे सध्या काँग्रेसचे प्रदेश सचिव आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या गडाला खिंडार पाडण्यासाठी ‘मराठा कार्ड’ वापरण्याची रणनीती काँग्रेसने आखली आहे. त्यामुळे अभय पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

छावा संघटनेनंतर मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून सामाजिक व राजकीय चळवळीत सक्रिय झालेले डॉ. अभय पाटील यांना काँग्रेसकडून अखेर उमेदवारी देण्यात आली आहे. गेल्या निवडणुकीत शासकीय सेवेतील त्यांचा राजीनामा सरकारने न स्वीकारल्यामुळे, त्यांना लोकसभा निवडणूक लढवता आली नव्हती. आता अभय पाटील यांना उमेदवारी मिळाल्याने अकोला मतदारसंघात तिहेरी लढत होणार आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!