Buldhana Constituency : बुलढाण्यात महायुतीमध्ये बिघाडी झाल्याचे समोर आले आहे महायुतीचे उमेदवार म्हणून प्रतापराव जाधव यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर ही भाजपचे बुलढाणा लोकसभा प्रमुख माजी आमदार विजयराज शिंदे यांनी आज सोमवारी आपला उमेदवारी अर्ज असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह भरला आहे. त्यामुळे बुलढाणा लोकसभा निवडणुकीत मोठी रंगत वाढली आहे.. जिल्ह्यात लोकसभेसाठी महायुतीत शिवसेनेला जागा सुटलेली असताना भाजपचे नेते माजी आमदार विजयराव शिंदे यांनी उमेदवारी अर्ज भरून एकच खळबळ माजवून दिली आहे..
विजयराज शिंदे यांनी एक अपक्ष आणि एक पक्षाकडून असे दोन उमेदवारी अर्ज भरले आहे. महायुतीच्या उमेदवाराच्या बॅनर्सवर विजयराज शिंदेंना जागा दिली जात नसल्याने विजयराज शिंदे नाराज होते, त्यातूनच त्यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भाजपच्या वरिष्ठांना आणि स्थानिक नेत्यांना आपण उमेदवारी अर्ज भरत असल्याच विजयराज शिंदे यांनी सांगितलं असल्याचं त्यांच्याकडून सांगितलं जात आहे.. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील लोकसभेत मोठ्या घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत.. महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार प्रतापराव जाधव यांचे कट्टर विरोधक म्हणून विजयराज शिंदे यांच्याकडे पाहले जाते..
बुलढाणा लोकसभा मतदारसंघात यापूर्वी फारसे बंड कधी बघायला मिळाले नाही, पण यावेळी पहिल्या दिवसापासूनच बंडाचा दांडा वर करण्याचे उद्योग सुरू झाले आहेत. शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी उमेदवारी जाहीर झालेली नसतानाही शिवसेनेकडून व एक अपक्ष म्हणून नामांकन अर्ज दाखल करून राज्यात खळबळ उडवून दिली होती. आता ते बंड, थंड झालेले दिसत असतानाच, तिकडे महायुतीच्या बुलढाण्यातील पहिल्याच कार्यकर्ता संवाद मेळाव्यात बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे भाजपाप्रमुख असतानाही याच मतदारसंघात ते शिवसेनेचे माजी आमदार असतानाही.. त्यांना ‘बॅनर’वरून डावलल्या गेल्यामुळे निमंत्रण असूनही त्यांनी या मेळाव्याला दांडी मारली. आता तर आज त्यांनी नामांकन अर्ज दाखल केल्याने महायुतीतही शिंदे शिवसेना व भाजपा मध्ये फार काही आलबेल आहे, अशातले चित्र नाही.