Lok Sabha Election 2024 : बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार प्रतापराव जाधव उद्या, मंगळवारी 2 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी रॅली व जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेसाठी शिवसेनेचे मंत्री, मुलूख मैदानी तोफ गुलाबराव पाटील व शिवसेनेच्या प्रवत्क्त्या ज्योती वाघमारे उपस्थित राहणार आहेत.
जाहीर सभा उद्या सकाळी 10 वाजता येथील जिल्हा परिषद मुलांची शाळा, जिल्हा परिषदेच्या पाठीमागील मैदानावर घेण्यात येणार आहे. बुलढाणा लोकसभा मतदारसंघात जवळपास सर्वच प्रमुख पक्षांचे उमेदवार जाहीर झाले आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अब की बार 400 पार संकल्पपूर्तीसाठी महायुतीत सहभागी असलेले भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं आठवले गट, पि.रि.पा. कवाडे गट, रयत क्रांती जाधव यांचे नाव जाहीर झाले आहे.
Lok Sabha Election 2024 : चर्चेत राहण्यासाठी ‘त्या’ दोन माजी आमदारांकडून नामांकनाची तयारी?
केंद्रात पुन्हा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनवण्यासाठी व बुलढाणा लोकसभेवर महायुतीचा भगवा झेंडा फडकवण्यासाठी महायुतीच्यावतीने नामांकन रॅली व जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही रॅली सकाळी १० वाजता शहरातील जयस्तंभ चौक परिसरातील गांधी भवन येथून शहर पोलीस स्टेशन मार्गे जनता चौक, कारंजा चौक मार्ग जिल्हा परिषद मुलांची शाळा मैदान येथे पर्यंत काढण्यात येणार आहे. जिल्हा परिषद मुलांची शाळा येथे रॅलीचे जाहीर सभेत रूपांतर केले जाणार आहे.
सभेत स्टार प्रचारक म्हणून शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील व ज्योती वाघमारे उपस्थित राहणार आहेत. यावेळी सभेत महायुतीचे माजी मंत्री आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे, माजी मंत्री आमदार डॉ. संजय कुटे, आमदार डॉ. संजय रायमुलकर, आमदार अॅड. आकाश फुंडकर, आमदार संजय गायकवाड, आमदार श्वेता महाले आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या सभेला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं आठवले गट, पि.रि.पा. कवाडे गट, रयत क्रांती व मित्र पक्षांच्यावतीने करण्यात आले आहे.