Vanchit Bahujan Aghadi on Congress : वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत आली असती तर विदर्भात भाजपचे सर्वाधिक नुकसान झाले असते. भाजपचे नुकसान टाळण्यासाठी नाना पटोले यांनी ‘वंचित’ला महाविकास आघाडीतून बाहेर ठेवले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्यावर भूमिकांमुळे वंचित महाविकास आघाडीत सहभागी होऊ शकली नाही. ‘वंचित’ला महाविकास आघाडीत न घेण्यामागे नाना पटोले यांचे भाजप प्रेम आडवे आल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. पटोले हे काँग्रेसमध्ये भाजपचे ‘स्लिपर सेल’ असल्यासारखा आरोप आंबेडकर यांनी थेटच केला.
भाजप नेत्यांसोबत काँग्रेसच्या नेत्यांचे हितसंबंध असल्याचा थेट आरोप करीत आंबेडकर यांनी रविवारी (ता. 31) अकोल्यात पत्रकार परिषद घेत खळबळ उडवून दिली. पटोले यांच्या विरुद्ध अनेक आरोप करीत आंबेडकरांनी निशाणा साधला. नाना पटोले यांना असुन त्यांचे भाजप प्रेम आता चव्हाट्यावर आल्याचा दावा आंबेडकर यांनी केला. काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांना भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात लढण्याचा आदेश काँग्रसने दिला होता. पक्षाचा हा आदेश पटोले यांनी ऐकला नाही.
Lok Sabha Election : ‘वंचित’ने अखेर जाहीर केली उमेदवारांची नावे, मात्र..
पटोले यांची भूमिका नेहमीच भाजपला मदत करणारी राहिली आहे, असेही आंबेडकर यांनी नमूद केले. ‘वंचित‘ने नागपूर लोकभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमदेवार आमदार विकास ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे. नागपुरात वंचित बहुजन आघाडीने भक्कम ‘फॉलोअर्स’ आहेत. त्यामुळे ठाकरे यांचा मतटक्का नक्कीच वाढेल. नागपूरच नव्हे तर ‘वंचित’ने लोकसभेच्या सात मतदारसंघात काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला आहे. अशात काँग्रेसने ‘वंचित’ला साथ देणे गरजेचे होते, असेही आंबेडकर म्हणाले. मात्र भाजपचे हस्तक असलेल्या पटोले यांना हे दिसले नाही. काँग्रेसच्या वरिष्ठांनी पटोले यांच्या भूमिकेची दखल घ्यावी, अशी मागणीही आंबेडकर यांनी केली.