Prakash Devtale : चंद्रपूर (Chandrapur) : काँग्रेसने (Congress) पूर्व विदर्भात समाजाला योग्य प्रतिनिधीत्व न दिल्यास आम्ही वेगळी भूमिका घेऊ असे जाहीरपणे सांगणारे चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष व महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभाचे उपाध्यक्ष प्रकाश देवतळे (Prakash Devtale) यांनी आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत भाजपाचे नेते उपमुख्यमंत्री (Devendra Fadnavis) देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व वन, सांस्कृतिक कार्य तथा मत्स्य व्यवसाय मंत्री (Sudhir Mungantiwar) सुधीर मुनगंटीवार, चिमूरचे आमदार बंटी भांगडीया यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये प्रवेश केला.
काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष देवतळे यांनी पूर्व विदर्भात काँग्रेसने वर्धा, नागपूर, भंडारा-गोंदिया किंवा चंद्रपूर या चार लोकसभा मतदार संघापैकी एक जागा काँग्रेस पक्षाला सोडावी, अशी मागणी अखिल भारतीय काँग्रेस समितीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तथा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे केली होती. मात्र, देवतळे यांच्या मागणीकडे पटोले व खरगे यांनी साफ दुर्लक्ष केले.
काय म्हणाले देवतळे?
प्रकाश देवतळे म्हणाले, बहुसंख्य असलेल्या तेली समाजाला काँग्रेसने विदर्भात एकही उमेदवारी दिलेली नाही. तेली समाज काँग्रेसच्या पाठिशी राहिला आहे. पण त्याची प्रदेश अध्यक्षांनी दखल घेतली नाही. त्यामुळे नाराजीतून आपण राजीनामा देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. देवतळे हे उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. भाजपमध्ये प्रवेश घेणार का? हे त्यांनी अद्याप स्पष्ट केलेले नाही.