गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेवराव किरसाण अजूनही भेटीगाठींमध्येच व्यस्त आहेत. लोकसभा निवडणूक होऊन सहा महिने होत आले तरी खासदार साहेबांना लोकांच्या समस्या ऐकण्याचा मुहूर्त सापडला नाही. त्यातच खासदार किरसाण यांच्या आमगाव येथील निवासस्थानाच्या 500 मीटरच्या आतील क्षेत्रात एक मोठा आणि महत्वाचा मुद्दा स्थानिक नागरिकांच्या समोर आहे.
आमगाव – गोंदिया मुख्य महामार्ग, जो चंद्रबारच्यासमोर नहरच्या पुलामुळे थांबलेला आहे, त्यामुळे त्या ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. स्थानिक नागरिक आणि व्यावसायिकांना धूळ आणि आवाजाची मोठी समस्या सहन करावी लागत आहे. यामुळे त्यांचं जीवन आणखी कठीण होत आहे, परंतु तरीही या विषयावर खासदार साहेबांचे लक्ष नाही.
स्थानिक नागरिकांना असे वाटते की, खासदार साहेबांच्या भेटीगाठी संपल्यानंतरच क्षेत्रातील विकासाला गती मिळू शकते. विशेषतः आमगाव ते गोंदिया दरम्यान असलेल्या प्रमुख महामार्गाच्या काम सूरू आहे तर काही ठिकाणी अर्धवट आहे. चंद्रबारच्या नहर पुलामुळे पावसाळ्यात किचड तर उन्हाळ्यात धूळ स्थानिक नागरिकांसाठी एक मोठा प्रश्न बनला आहे.
तथापि, खासदार डॉक्टर किरसाण यांच्या कडून अजूनही या मुद्द्यावर कोणतीही ठोस कार्यवाही किंवा विकासाची आश्वासना दिली गेलेली नाही. येथील दुकानदारही चिंतेत आहेत, कारण त्यांना धुळीमुळे होणाऱ्या नुकसानामुळे व्यवसायावर प्रतिकूल परिणाम होत आहे. त्याचप्रमाणे, वाहतुकीच्या गडबडीमुळे रोजच्या जीवनातील सोयी सुविधाही प्रभावित झाल्या आहेत.
स्थानिक नागरिकांचे असे म्हणणे आहे की, निवडणुकीच्या काळात विविध आश्वासनांच्या मालिका होतात, परंतु निवडणूक झाल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. त्यांचं म्हणणं आहे की, खासदार साहेब केवळ त्यांची भेटीगाठी पूर्ण करतील आणि मगच विकासाचे पाऊल टाकतील, असे प्रतित होते.
त्यामुळे, येणाऱ्या काळात स्थानिक नागरिकांना या समस्येचे निराकरण होईल की नाही, याची उत्तर काहींना अद्याप मिळालेली नाही. जर खासदार साहेबांच्या भेटीगाठींमध्ये त्यांचा सहभाग कमी होईल, तरच विकासाची खरी गती मिळू शकेल.