Election : पश्चिम वऱ्हाडात विधानसभा निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने अनेक उमेदवार भाजपकडून आयात केले. पण तरीही अकोला, वाशीम व बुलढाणा जिल्ह्यात फक्त एक मतदारसंघ वगळता शिंदे सेनेला सपशेल अपयश आले. त्यामुळे पक्षांतर्गत खदखद वाढली आहे. पदाधिकारी व कार्यकर्ते आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी वेगळी वाट निवडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे राज्यात महायुती सत्तेत आल्यामुळे अनेकांनी महायुतीतील मित्र पक्षांमध्ये प्रवेश करीत सत्तेचा लाभ उचलण्याची तयारीही चालविली आहे.
महायुतीमध्ये अकोला, वाशीम व बुलढाणा जिल्ह्यात शिंदे यांच्या शिवसेनेने विधानसभेच्या पाच जागा लढवल्या होता. त्यापैकी चार जागांवर पराभव झाला. अकोला जिल्ह्यातील बाळापूर मतदारसंघात भाजपकडून उमेदवार आयात करूनही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विद्यमान आमदार नितीन देशमुख यांच्या विरोधात पराभव झआला. माजी आमदार बळीराम सिरस्कार तिसऱ्या स्थानावर राहिले. प्रचारात अनेक वेळा उमेदवार व पदाधिकाऱ्यांमध्ये वादाचे खटके उडाले. निवडणूक निधीसह अनेक कारणावरून वाद विकोपाला गेला. महायुतीत कुठलाही समन्वय नव्हता. ही जागा कायम राहवी म्हणून भाजपची किती मदत मिळाली, याची चाचपणी आता भाजप पक्ष श्रेष्ठींकडूनच सुरू झाल्याची माहिती आहे.
रिसोडमध्ये उमेदवार पाडला?
वाशीम जिल्ह्यातील रिसोडमध्ये सुद्धा शिंदेच्या शिवसेनेने माजी आमदार भावना गवळी यांनी उमेदवारी देऊनही त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. त्यांना लोकसभेत तिकीट नाकारल्यामुळे विधान परिषेदवर निवडण्यात आले. या निर्णयाने महायुतीत खडके उडल्याचेही बोलल्या जात आहे. त्यातच भावना गवली यांच्या विरोधात खुद्द शिंदे यांच्या शिवसेनेतीलच काही नेत्यांनी काम केल्याचीही चर्चा आहे. हा वाद काँग्रेसच्या पथ्यावर पडला.
अपयश जिव्हारी
बुलढाणा जिल्ह्यात शिंदे यांच्या शिवसेेनेचे खासदार निवडून आले आहेत. त्यामुळे पश्चिम वऱ्हाडात सर्वाधिक तीन मतदारसंघात महायुतीकडून उमेदवारी मिळाल्यानंतरही केवळ बुलढाणा मतदारसंघात संजय गायकवाड यांचा अवघ्या 800 मतांनी निसटता विजय झाला. सिंदखेड राजा raja व मेहेकरमध्ये झालेला पराभव एकनाथ शिंदे यांच्या चांगलाच जिव्हारी लागल्याची माहिती आहे. शिंदे यांनी निवडणूक काळात विदर्भात सर्वाधिक वेळा बुलढाणा जिल्ह्यालाच भेटी दिल्या व सभाही घेतली होती. त्यामुळे आता त्यांनी येथील अपयशामागील कारणे शोधून काढण्यास सुरुवात केल्याची माहिती आहे.