महाराष्ट्र

Bhandara : गोसेखुर्द प्रकल्पस्तांसाठी नाना पटोले आक्रमक !

Nana Patole : सरकारवर केली सडकून टीका 

Mahayuti : गोसेखुर्द प्रकल्पाच्या प्रलंबित पुनर्वसनावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारवर जोरदार टीका केली. नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात माध्यमांशी बोलताना पटोले यांनी प्रकल्पग्रस्तांच्या हक्कांसाठी सरकारला जाब विचारला. “चार पिढ्या संपल्या तरी गोसेखुर्द प्रकल्प अद्याप पूर्ण झालेला नाही. प्रकल्पग्रस्त 22 गावांतील नागरिक आजही योग्य मोबदल्याच्या प्रतीक्षेत आहेत,” असे पटोले म्हणाले.

पटोले यांनी यावेळी सरकारवर प्रकल्पग्रस्तांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्याचा आरोप केला. प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या गेल्या, मात्र त्या मोबदल्यात योग्य रक्कम मिळालेली नाही. जसे सीएसआर अंतर्गत कंपन्यांची जबाबदारी वाढते, तसेच शेतकऱ्यांच्या जमिनींच्या किमती वाढवल्या पाहिजे आणि त्यांना न्याय मिळाला पाहिजे, असे पटोले यांनी ठणकावून सांगितले.

मुलांच्या नोकऱ्यांचा मुद्दा..

प्रकल्प सुरू असताना सरकारने प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना सरकारी नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्यापही या आश्वासनांची पूर्तता झालेली नाही. “प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना नोकऱ्या मिळणे, हा त्यांचा अधिकार आहे. पण सरकारने त्यांना फक्त आमिष दाखवले आणि त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवले, असे पटोले म्हणाले.

महिलांचे आंदोलन आणि दुर्लक्ष..

गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त महिलांनी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी दिवस-रात्र पाण्यात उभे राहून आंदोलन केले होते. या महिलांचे त्याग आणि संघर्ष पाहूनही सरकारने कोणतीही ठोस पावले उचललेली नाहीत. महिलांच्या आंदोलनानेही सरकारला जाग आली नाही, ही खेदजनक बाब आहे,” असे पटोले यांनी नमूद केले.22 गावांमधील प्रकल्पग्रस्तांचे योग्य पुनर्वसन अद्यापही झालेले नाही. “या गावांतील नागरिकांनी प्रकल्पासाठी आपले घर-दार गमावले. मात्र त्यांना योग्य पर्याय किंवा सुविधा मिळालेल्या नाहीत. हे सरकारच्या असंवेदनशीलतेचे उदाहरण आहे,” असेही पटोले म्हणाले.

Farmers Loan : गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची प्रतीक्षा !

लवकर निर्णय 

गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न सोडवण्यासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकारने तातडीने पावले उचलली पाहिजे. गोसेखुर्द प्रकल्प हा मागील अनेक वर्षांपासून अपूर्ण राहिला आहे. प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांवर तोडगा काढून त्यांना न्याय देण्यासाठी सरकारने आता ठोस पावले उचलली नाहीत, तर या प्रकल्पाचे भवितव्य आणि सरकारची विश्वासार्हता दोन्ही धोक्यात येऊ शकतात, असेही नाना पटोलेनी सांगितले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!