महाराष्ट्र

Nagpur winter session : मलईदार खात्यांसाठी अडले सारे!

Mahayuti : अधिवेशन संपतय, पण खातेवाटप रखडलेलेच

Maharashtra Government : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आता एक महिना व्हायला आलाय. राज्यात स्थिर सरकार आले आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे शपथविधी झालेले आहेत. मंत्र्यांनीही जनसेवेच्या शपथा घेतल्या आहेत. पण खातेवाटपाचा तिढा मात्र अद्याप सुटलेला नाही. आता तर हिवाळी अधिवेशन संपायलाही दोन दिवसांहून कमी कालावधी उरलेला आहे. तरीही खातेवाटप निश्चित झालेले नाही. तिन्ही पक्ष मलईदार खात्यांसाठी अडलेले आहेत, असे आता बोलले जात आहे.

विधानसभा निवडणुकीच्या निकालाने महायुतीला पूर्ण बहुमत दिलं. महाविकास आघाडीकडे विरोधीपक्षनेता निवडीचेही अधिकार राहिलेले नाहीत. तिन्ही पक्ष मिळून साधा 50 चा आकडाही गाठता आलेला नाही. दुसरीकडे महायुतीमध्ये तिन्ही पक्षांची दमदार कामगिरी राहिली आहे. पण मुख्यमंत्री ठरविण्यासाठी दोन आठवडे लागले. नेहमीप्रमाणे भाजप मोठा भाऊ असल्यामुळे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. राजी-नाराजीच्या घडामोडींनंतर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री व्हायला तयार झाले. तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची विक्रमी शपथ घेतली. त्यानंतर मंत्रिमंडळात कुणाला स्थान द्यायचे, यासाठी दहा दिवस लागले.

दहा दिवस

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी आटोपल्यावर मंत्रिमंडळ ठरविण्यासाठी दहा दिवस लागले. त्यातही नव्या चेहऱ्यांना संधी देतोय असे सांगत 15 डिसेंबरला नागपुरात शपथविधी घेण्यात आला. ज्येष्ठांना डावलल्याने पुन्हा नाराजीनाट्य सुरू झाले. मात्र, छगन भुजबळ वगळता इतरांनी पक्षाचा आदेश मानला. पण तरीही अद्याप खातेवाटप झालेले नाही. सर्वांत मोठा प्रश्न फक्त गृह खात्याचा होता. या खात्यासाठी एकनाथ शिंदे अडून बसले होते. पण नंतर त्यांची नाराजी दूर झाली. कोणत्या आश्वासनावर त्यांची नाराजी दूर झाली, हे अद्याप कळलेले नाही.

Congress Politics : भाई जगताप, डॉ. राऊतांनी केली प्रशंसा, भुजबळ काँग्रेसमध्ये जाणार ?

भ्रष्टाचार

दुसरीकडे, अनेक खात्यांकडे मलई देणारे खाते म्हणून बघितले जाते. अर्थात अनेक मंत्र्यांनी भ्रष्टाचारविरहित काम केले आहे. पण तरीही तिन्ही पक्षांतील मंत्र्यांनी या खात्यांसाठी फिल्डिंग लावली आहे. ही खाती कोणती आहेत आणि कोणत्या खात्यांसाठी कोण अडलय, हे तर अद्याप गुपित आहे. मात्र, सध्या समाज माध्यमांवर मंत्रिमंडळाची यादी जाहीर झाली आहे. ही यादी कुणी व्हायरल केली, त्यात किती सत्यता आहे, हे तर खरी यादी जाहीर झाल्यावरच कळेल. मात्र, व्हायरल झालेल्या यादीत ऊर्जा खातं चंद्रशेखर बावनकुळे, महसुल खातं विखे-पाटील, उद्योग उदय सामंत, कृषी हसन मुश्रीफ, गृहनिर्माण मंगलप्रभात लोढा यांना देण्यात आल्याचं म्हटलं आहे. खरी यादी पुढे आल्यावरच चित्र स्पष्ट होईल.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!