माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आता काही काम राहिलेले नाही. काल ते नागपूर अधिवेशनात आले, पण केले काय? तर याला भेट, त्याला भेट आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी घरी थेट, असे म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंची खिल्ली उडवली. आमचे सरकार आल्यावर ‘याला जेलमध्ये टाकू त्याला जेलमध्ये टाकू’ ची भाषा करणारे उद्धव ठाकरे आज हातबल झालेले दिसत आहेत, असेही शिंदे म्हणाले.
विधान भवन परिसरात आज (18 डिसेंबर) एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांची संवाद साधला. ते म्हणाले, उद्धव ठाकरे काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले. ही चांगली गोष्ट आहे कारण मुख्यमंत्र्यांना कोणीही भेटू शकतात. उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीचे नेते evm च्या विरोधात आंदोलने करत आहेत. त्यांना ईव्हीएमचा विरोध करायचाच असेल तर सभागृहामध्ये करावा. तेथे प्रश्न उपस्थित करावे. त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री समर्थ आहेत. सभागृहाच्या बाहेर नारेबाजी करून नौटंकी कशाला करायची, असा सवाल एकनाथ शिंदे यांनी केला.
..15000 कोटी रुपये दिले
नुसती नौटंकी करूनही मीडियामध्ये त्यांना दाखवलं जातं सध्या ते यामध्ये समाधान मानत आहेत. शेतकऱ्यांना आम्ही नुकसान भरपाईपोटी आत्तापर्यंत 15000 कोटी रुपये दिले. आजपर्यंतच्या इतिहासात कुठल्याही सरकार पेक्षा सर्वाधिक मदत शेतकऱ्यांना आम्ही केली आहे. यापुढेही शेतकऱ्यांना आम्ही कधीच वाऱ्यावर सोडणार नाही. आमचं सरकार टीम म्हणून काम करते. आणि शेतकरी हा आमचा केंद्रबिंदू राहणार आहे.
मराठा समाजाच्या सरपंचाची हत्या करण्यात आली. यामध्ये धनंजय मुंडे यांचे निकटम वाल्मीक कराड यांच्यावर थेट आरोप केला जात आहे या संदर्भात विचारले असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या चर्चेला सभागृहात उत्तर देणार आहेत. अध्यक्षांनी या चर्चेला परवानगी दिलेली असल्याचे शिंदे म्हणाले. खाते वाटपाबाबत कुठे रनाराजी आहे का, असे विचारले असता, आम्ही महायुती म्हणून काम करतो. पदांसाठी आमच्यामध्ये कुठलीही स्पर्धा नाही. पदांसाठी स्पर्धा कुठे होती हे सगळ्यांना माहिती आहे, असा टोला त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना लगावला.
Nagpur winter session : भुजबळांनी स्पष्टच सांगितलं, पक्षात वाईट वागणूक मिळाली!
लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर विधानसभेची निवडणूक घोषितही व्हायची होती, तेव्हा त्यांचे मंत्रिमंडळ तयार झाले होते. मुख्यमंत्री कोण उपमुख्यमंत्री कोण, कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री, खाते हे सगळं त्यांचं ठरलेलं होतं, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी पुन्हा महाविकास आघाडीच्या नेत्यांवर प्रहार केला. आम्हाला पद कोणते मिळेल, आम्हाला खात कोणतं मिळेल, यापेक्षा आमच्या सरकारमधून या महाराष्ट्राला काय मिळेल, काय जास्तीत जास्त आणि चांगल्यात चांगल काय देता येईल, ही आमची भूमिका आहे, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.