महाराष्ट्र

Mahayuti 2.0 : स्थळ, काळ, वेळ बदलली; टेकडी गणपतीच्या गावी शपथविधी

Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त सापडेना 

Maharashtra Government : मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला आता आठ दिवस झाले आहेत. त्यानंतरही महायुती सरकारला कॅबिनेटच्या विस्ताराचा मुहूर्त सापडेनासा झाला आहे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे तिघेही सध्या बिनखात्याचे मंत्री म्हणून काम करीत आहेत. दिल्ली येथे झालेल्या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दांडी मारली. त्यामुळे कॅबिनेट मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला. विशेष अधिवेशनानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. परंतु त्यानंतरही हा मुहूर्त महायुतीला साधता आला नाही. त्यामुळे आता नागपूरमध्ये मंत्र्यांचा शपथविधी होण्याची दाट शक्यता आहे. 

भारतीय जनता पार्टीकडून संभाव्य मंत्र्यांची यादी ठरली आहे. त्यांचे खातेवाटपही ठरलेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही कोण मंत्री होणार याबाबत एक मत झाले आहे. केवळ शिवसेनेमध्ये मंत्री पदाच्या बाबतीत निर्णय प्रलंबित आहे. शिवसेनेमधील काही नेत्यांच्या नावावर भारतीय जनता पार्टीचा आक्षेप आहे. याशिवाय गृह आणि महसूल विभाग एकनाथ शिंदे यांना हवा आहे. हे दोन्ही विभाग शिवसेनेला देण्यास भारतीय जनता पार्टी तयार नाही. त्यामुळे वारंवार बैठक घेऊन देखील गृह आणि महसूल यावर तोडगा निघालेला नाही.

इतिहासात प्रथमच 

महायुतीमधील तीनही पक्षांचे मंत्रिमंडळाबाबत एक मत झाले तर नागपूर येथे कॅबिनेट मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. असं झाले तर नागपूरच्या इतिहासात पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्रिमंडळाचा शपथविधी आयोजित होणार आहे. हिवाळी अधिवेशन सुरू होण्यास अद्यापही काही तासांचा अवधी शिल्लक आहे. अशात महायुतीमध्ये एक मत झाले तर रातोरात शपथविधीची व्यवस्था राजभवनात होऊ शकते. मात्र या संदर्भातील शक्यता कमीच असल्याचे नेत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे कदाचित नागपूरमध्ये शपथविधी होऊ शकतो.

महायुतीला सरकार स्थापनेच्या वेळी मुख्यमंत्री पदाच्या नाव निश्चितीचे विघ्न काही काळ सोसावे लागले. हे विघ्न दूर झाल्यानंतर आता गृह, महसूल आणि मंत्रिमंडळाच्या विस्ताराचे अडथळे महायुती पुढे येत आहेत. बुद्धीची देवता गणपती यांना विघ्नहर्ताही म्हटले जाते. बहुमत मिळाल्यापासून आलेल्या विघ्नांची मालिका काही अंशी मुंबादेवीतील सिद्धिविनायकाने दूर केली. भाजपच्या कार्यकर्त्यांना प्रिय असलेल्या ‘देवाभाऊ’ला मुख्यमंत्री पद मिळावे, ही मनोकामना बापाने सिद्ध केली. मात्र कदाचित मंत्रिमंडळाच्या विस्ताराचे विघ्न आपल्या दुसऱ्या रूपासमोर दूर व्हावं अशी बाप्पाची इच्छा असावी. त्यामुळे टेकडी गणपतीचं गाव असलेल्या नागपूरमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराचे संकेत आहेत.

NCP : अनिल देशमुख यांच्या घरासमोर राष्ट्रवादीची ‘दादागिरी’

कोणाला पावणार?

निवडणुकीचा निकाल लागल्यापासून सत्ता स्थापनेची ओढाताण कायम होती. बाप्पाने कृपा करत ‘देवाभाऊ’ला मुख्यमंत्री पदाचा प्रसाद दिला. आता मंत्रिपदाची आस लावून बसलेल्या कोणकोणत्या आमदारांना नागपूरमधील टेकडी गणपतीचा बाप्पा पावतो, याची उत्सुकता अन् प्रतीक्षा सर्वांनाच आहे. विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदाचा निकालही हिवाळी अधिवेशनातच लागू शकतो, असेही सांगितले जात आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!