महाराष्ट्र

Vijay Wadettiwar : पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे आंदोलन पेटले!

Parbhani : विजय वडेट्टीवार यांची टीका; संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी

Constitution : परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे. याच पुतळ्याजवळील संविधानाची प्रत एका माथेफिरूने उचलून बाजूला ठेवत विटंबना केली. त्यानंतर शहरातील आंबेडकरी अनुयायी संतप्त झाला. मंगळवारी संध्याकाळीच रेल्वे रोको तसेच घटनास्थळी रस्ता रोको करत निषेध नोंदवला. त्यानंतर बुधवारी परभणी बंदची हाक देण्यात आली होती. तरीदेखील काही लोक रस्त्यावर उतरल्याने हे आंदोलन पेटले आहे. परभणी शहरात संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाल्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. या घटना उघडकीस आल्यानंतर प्रशासन आणि पोलीस दलाने तात्काळ योग्य कारवाई करायला हवी होती. मात्र ते न झाल्यामुळे आज परिस्थिती चिघळली, असा आरोप काँग्रेसनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केला.

पोलिसांनी संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली पाहिजे. तसेच सरकारने जनतेला आश्वासित करावे की, या प्रकरणात कोणतीही हयगय केली जाणार नाही. संविधानप्रेमी जनतेने देखील शांतता आणि संयम बाळगावा. प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन विजय वडेट्टीवार यांनी केले आहे. परभणी शहरात घडलेला प्रकार संतापजनक आहे. हे कृत्य करणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे. संविधानाचा अवमान करणाऱ्यांना त्यातील समतेची तत्वं अमान्य आहेत असेच म्हणावे लागेल. या घृणास्पद कृत्याचा निषेध करतो, असंही ते म्हणाले.

 

बुधवारी संपूर्ण परभणीत बंदची हाक देण्यात आली होती. तरीही देखील काही आंदोलक रस्त्यावर उतरले. यात पोलिस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली. काही ठिकाणी दगडफेकही करण्यात आली. या आंदोलनात महिलांचाही समावेश दिसून आला. आंदोलक आक्रमक झाल्यानंतर बंदला हिंसक वळण लागले आहे. काही ठिकाणी दगडफेक, तर काही दुकानांची जाळपोळ देखील यावेळी करण्यात आली आहे. यातच आता आंदोलकांना शांत करण्याचे आवाहन विविध राजकीय नेत्यांकडून करण्यात येत आहे.

Prakash Ambedkar : कारवाईची मागणी; अन्यथा परिणामांचा इशारा 

आंबेडकरांचे आवाहन

मी सर्वांना विनंती करतो की, कायदा आणि सुव्यवस्था हातात घेऊ नका. शांतता राखा. येत्या 24 तासांत प्रशासनाने सर्व हल्लेखोर समाजकंटकांना अटक केली नाही तर त्याचे परिणाम भोगावे लागतील. असा इशाराही प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!