महाराष्ट्र

Nitesh Rane : लाडकी बहीण योजनेतून मुस्लिम महिलांना वगळा

BJP : नितेश राणे यांच्या मागणीमुळं नवा वाद

Mahayuti 2.0 : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत ‘गेमचेंजर’ ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून मुस्लिम महिलांना वगळण्याची मागणी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केली आहे. राण यांच्या या वक्तव्यामुळं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुसलमान समाज महायुती सरकारच्या योजनेचा लाभ घेतात. मात्र त्यांना मोदी नको, हिंदुत्ववादी सरकार नको आहे. जे पंतप्रधान मोदींवर विश्वास ठेवतात अश्या लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ मिळाला पाहिजे. धर्म महत्त्वाचा असेल तर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ कशाला घेता? अस सवालही राणे यांनी केला.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे जास्तीत जास्त लाभार्थी हे मुसलमान समाजातील आहेत. त्यामुळं आपण मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहोत. आदिवासी समाज वगळता दोन पेक्षा जास्त आपत्य असलेल्या व्यक्तींना या योजनेतून वगळावे. त्यामुळे हिंदू समाजाला लाभ मिळेल, असं राणे म्हणाले. राणे यांच्या या वक्तव्यानंतर आता टीकेला सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडी मधील नेत्यांनी राणे यांच्यावर टीका केली आहे. महायुतीच्या नेत्यांनीही राणे यांच्या भाष्यावर मत व्यक्त केलं.

आणखी एक वाद

भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं की, यावर सरकार काय भूमिका घेईल ते घेईल हे पाहता येईल. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी राणे यांच्यावर टीका केली. कोणतीही सरकारी योजना धर्मावर चालत नाही. धर्मावर योजना चालवायच्या असेल तर जाहीर करावे. महायुतीमधील काही नेत्यांना मस्ती आली आहे. ते धार्मिक तेढ निर्माण करीत आहेत, असं पटोले म्हणाले.

Parbhani Tension : संविधानाच्या विटंबनेनंतर हिंसक उद्रेक

बांगलादेशात निर्माण झालेल्या अराजकतेवरही राणे यांनी भाष्य केले. राणे म्हणाले की, बांगलादेशात ओळख विचारून मारलं जात आहे. सामूहिक बलात्कार होत आहेत. बांगलादेशातील अनेक लोक भारतात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगलादेशला इशारा दिला आहे. अशात आपण पंतप्रधान मोदी यांना विनंती करतो की त्यांनी पोलिसांना बाजूला करावं. असं झालं तर बांगलादेशींना पाच मिनिटही शिल्लक ठेवणार नाही. यापुढचा मूक मोर्चा नसेल. याला धमकी समजायची तर समजा. भारतात अशा लोकांचे लाड सुरू आहेत. त्यामुळं दोनपेक्षा जास्त अपत्य असणाऱ्यांना लाडकी बहीण योजनेचा फायदा देऊ नका, असंही राणे म्हणाले.

हिंदू समाजावर जो अन्याय होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठल्याही हिंदूवर अत्याचार होऊ देणार नाही. सरकार मधून बाजुला झालं तर मुस्लिमांना, रोहिंग्यांना ठेचायला वेळ लागणार नाही. बांगलादेशात इस्कॉनच्या धर्मगुरुंना अटक केली आहे. त्यांची केस घेणाऱ्या वकिलांनाही मारलं गेलं आहे. त्यामुळं यांना जसंच्या तसं उत्तर देणं गरजेचं असल्याचंही नितेश राणे म्हणाले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!