महाराष्ट्र

Parbhani Tension : संविधानाच्या विटंबनेनंतर हिंसक उद्रेक

Police Action : अनेक ठिकाणी जाळपोळ, पोलिसांकडून बळाचा वापर

Contempt Of Constitution : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर ठेवलेल्या संविधानाची विटंबना करण्यात आली आहे. हा प्रकार परभणी शहरात उघडकीस आला आहे. त्यानंतर शहरात तणाव निर्माण झाला. घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंदला हिंसक वळण लागलं. त्यामुळं पोलिसांना बळाचा वापर करीत जमावाला पांगवावे लागले. अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. त्यामुळं परभणीत तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे. पुतळ्यासमोर संविधानाची प्रत ठेवण्यात आली आहे. मंगळवारी (10 डिसेंबर) या संविधानाच्या प्रतिची विटंबना करण्यात आल्याचं उघडकीस आली होती.

विटंबनाच्या या घरटनेनंतर विटंबना करणाऱ्याला उपस्थितांकडून जोरदार चोप देण्यात आला. नागरिकांनरी त्याला पोलिसाच्या ताब्यात दिलं. या प्रकारामुळं आंबेडकरी अनुयायी संतप्त झालेत. आंबेडकर पुतळा परिसरात जोरदार निदर्शने करण्यात आली. रेल रोकोही करण्यात आला. त्यानंतर परभणीत आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. या घटनेनंतर बुधवारी (11 डिसेंबर) बंद पुकारण्यात आला होता. जिंतूर रोडवरील विसावा फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. त्यानंतर हिंसक घटनेला सुरुवात झाली.

व्यापक बंदोबस्त

हिंसक आंदोलनाला सुरुवात झाल्यानंतर दुकाने, रस्त्यावर गाड्यांची जाळपोळ करण्यात आली. काही ठिकाणी दगडफेक करण्यात आली. जमावानं पोलिसांनाही लक्ष्य केलं. त्यांच्यावर ही तुफान दगडफेक करण्यात आली. त्यामुळं पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडत आक्रमक झालेल्या आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न केला. काही ठिकाणी बळाचा वापर करीत जमावाला पांगविण्यात आले. परभणीत दंगल नियंत्रण पथकही तैनात करण्यात आलं आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार राहुल पाटील यांनी नागरिकांना शांत राहण्याचं आवाहन केलं. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांनही नागरिकांना संयम राखण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

Mahayuti 2.0 : मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी हालचालींना वेग

परभणी शहरातील सात ठिकाणी जाळपोळ करण्यात आली. अनेक ठिकाणी बॅनरची तोडफोड करून रस्त्यावर पेटून देण्यात आलेत. पोलिसांकडून परभणीतील रस्त्यावर मार्च काढण्यात आला. आंदोलक आणि जिल्हाधिकाऱ्याची बैठक घेण्यात आली. तरुणाईनं भावनांवर नियंत्रण ठेवावे असं आवाहन करण्यात आलं. संविधानाची विटंबना अत्यंत दुर्दैवी व संतापजनक आहे. समाजकंटाकावर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनीही केलं संविधानाच्या प्रतिची ज्या व्यक्तीनं विटंबना केली तो व्यक्ती मानसिकदृष्टीने आजारी असल्याचं सांगण्यात येत आहे. पोलिसांसमक्ष या व्यक्तीला अमानुष मारहाण केली. पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने त्याचा जीव वाचला. सोपान दत्तराव पवार (वय 45) असे आरोपीचे नाव आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!