Maharashtra Government : मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री वगळता महायुती सरकारमध्ये अद्याप कोणालाही मंत्रिपद मिळालेलं नाही. आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आलेली नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गृह विभाग हवे आहे. मात्र भाजपकडून हा विभाग एकनाथ शिंदे यांना देण्याची तयारी नाही. त्यामुळं गृह विभाग देवेंद्र फडणवीस यांच्याकडंच राहणार आहे. याशिवाय महसूल विभागही शिंदे यांना हवं आहे. यासंदर्भात दिल्लीतील बैठकीत चर्चा होणार आहे. महायुतीत भाजपच्या आमदारांचं संख्याबळ अधिक आहे. त्यामुळं मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळात भाजपच्या मंत्र्यांची संख्याही जास्त राहणार आहे. हा फार्मूला दिल्लीतील बैठकीत होणार आहे.
दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सोबत तिन्ही नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत गृह आणि महसूल दोन्ही खात्यांचा निकाल लागणार आहेत. या बैठकीसाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यांच्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार हे देखील दिल्लीकडे रवाना होणार आहेत. मंत्रिमंडळासंदर्भातील या बैठकीपूर्वी मेघदूत बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची रात्री दीड वाजेपर्यंत चर्चा झाली.
संख्याबळ ठरणार
मंत्रिमंडळात किती मंत्री असावेत, किती कॅबिनेट आणि किती राज्यमंत्री असावेत आणि कुणाला कोणती खाती द्यावी याची फडणवीस, शिंदे, पवार यांनी केली आहे. हा फार्मूला अमित शाह यांच्यापुढं ही संख्या मांडण्यात येणार आहे. बैठकीत पालकमंत्रीपद आणि महामंडळावरही चर्चा झाली आहे. आता ही संपूर्ण यादी अमित शाह यांच्यापुढं सादर करण्यात येणार आहे. मात्र अद्यापही शिवसेनेकडून गृहमंत्री आणि महसूल विभागाची मागणी कायम आहे. आता तिढा अमित शाह यांच्यापुढं सुटणार असल्याचंही सांगण्यात येत आहे.
महायुतीमध्ये जोपर्यंत गृहमंत्री आणि महसूल विभागाच्या मुद्द्यावर तोडगा निघत नाही, तोपर्यंत आमदारांना मंत्रिपदाची शपथ देता येणार नाही. त्यामुळं हा तिढा सर्वांत आधी सोडवावा लागणार आहे. तोपर्यंत हा तिढा सुटत नाही तोपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार करता येणार नाही. त्यामुळं येत्या काही तासात महायुतीमधील तीनही नेत्यांना खातेवाटपाचा तिढा सोडवावा लागणार आहे. अमित शाह यांच्या बैठकीपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे हे दिल्लीत दाखल झाले आहेत. बैठकीत प्रामुख्याने महसूल आणि गृहखात्यावर चर्चा होईल. या बैठकीनंतर मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा होणार आहे. नागपूर येथे लगेचच हिवाळी अधिवेशन होणार असल्यानं आता काही तासांमध्ये महायुतीमधील तीनही नेत्यांना हा तिढा सोडवावा लागणार आहे.