महाराष्ट्र

Chief Minister Welcome : मी पुन्हा आलो, नागपुरात असे होणार फडणवीसांचे प्रथम आगमन !

Devendra Fadnavis : 18 फूट ऊंच रथावरून निघणार मिरवणूक

Nagpur BJP : महाराष्ट्रात विधानसा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून आला आहे. सोबतच महायुतीने विजयाचा नवा विक्रम यावेळी केला आहे. ‘न भूतो’ असे यश महायुतीने मिळवले आहे. देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रि‍पदी निवड झाल्यानंतर प्रथमच नागपूर शहरात गुरूवारी (12 डिसेंबर) येणार आहेत. यासाठी भाजपने त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली आहे.

नागपूर विमानतळावर दुपारी 3 वाजता देवेंद्र फडणवीस यांचे आगमन होणार आहे. त्यानंतर सर्वप्रथम ते माध्यमांशी संवाद साधतील. विमानतळावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालून अभिवादन करतील. मिरवणुकीसाठी विशेष रुपाने तयार करण्यात आलेल्या 18 फूट ऊंच रथावरून त्यांच्या मिरवणुकीला सुरुवात होईल. नागपूर विमानतळ ते त्यांचे घर असलेल्या लक्ष्मीभूवन चौकापर्यंत त्यांची जंगी मिरवणूक काढण्यात येणार आहे.

गैरसोय होणार नाही

मिरवणुकीदरम्यान मार्गातील प्रत्येक चौकात कार्यकर्ते त्यांच्या स्वागतासाठी सज्ज राहणार आहेत. याशिवाय मुस्लीम, शीख, वाल्मिक, सुदर्शन आदी समाजबांधवांतर्फे मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. सर्व समाजांच्या प्रतिनिधींनी स्वागत करण्यासाठी वेगळ्या जागेची आणि वेळेची मागणी केलेली आहे. जेणेकरून मिरवणुकीदरम्यान कुठेही गर्दी होणार नाही आणि कुणाचीही गैरसोय होणार नाही. त्यांच्यासाठी तशी व्यवस्था करण्यासाठी तयारी सुरू आहे, अशी माहिती देवेंद्र फडवीस यांचे मानद सचिव संदीप जोशी आणि शहराध्यक्ष बंटी कुकडे यांनी दिली.

रेडीसन ब्यू चौकात भाजपच्या पूर्व नागपूर संटनेतर्फे त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर छत्रपती चौकात दक्षिण नागपूरतर्फे, स्नेहनगर पेट्रोलपंप चौकात लाडक्या बहीणी त्यांना औक्षवण करतील. त्यानंतर लक्ष्मीनगर चौक, मध्य नागपुरातील बजाज नगर चौक आणि शंकरनगर चौकातही त्यांचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे. यावेळी भाजपचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहतील, असेही संदीप जोशी यांनी सांगितले.

Kishor Jorgewar : महाऔष्णिक केंद्राच्या संचांमुळे वाढले प्रदूषण

फडणवीस यांना झेड प्लस दर्जापेक्षाही अधिक सुरक्षा व्यवस्था प्रदान करण्यात आली आहे. त्यासाठी मिरवणुकीसाठीचा रथ 18 फूट ऊंच तयार करण्यात आला आहे. मिरवणुकीदरम्यान पोलिस यंत्रणा सुरक्षेची विशेष काळजी घेणार आहेत. गर्दीमध्ये फटाक्यांची आतषबाजी करता येणार नाही. आकाशात उडणारे फटाके फोडता येणार नाहीत. घोडे, हत्ती किंवा इतर प्राण्यांचा समावेश मिरवणुकीत करता येणार नाही. फडणवीसांना मिठाई किंवा इतर खाद्य पदार्थ देता येणार नाहीत. गुलाल फेकता येणार नाही, अशा अटी पोलिसांनी घातल्या आहेत आणि या अटींचे सर्वांनी पालन करावे, असे आवाहन संदीप जोशी यांनी केले आहे.

सायंकाळी 7 वाजता सभा..

विजयी मिरवणुकीचा समारोप सायंकाळी 7 वाजता लक्ष्मीभूवन चौकात होणार आहे. येथे सभा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी फडणवीस संबोधित करणार आहेत. त्यासाठी विशेष व्यासपीठ तयार करण्यात येत असल्याचेही संदीप जोशी आणि बंटी कुकडे यांनी सांगितले. यावेळी महिला मोर्चाच्या अध्यक्ष प्रगती पाटील, प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे, बाल्या बोरकर, संदीप गवई, आश्विन जिचकार आदी उपस्थित होते.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!