महाराष्ट्र

Buldhana : फडणविसांचे ‘विश्वासू’ विद्याधर महाले खासगी सचिव

Devendra Fadnavis : मंत्रालयात आनंद; प्रशासकीय कामकाजाचा गाढा अभ्यास

Vidyadhar Mahale Patil : मंत्रालयातील प्रशासकीय कामकाजाचा गाढा अभ्यास असणारे व आपल्या कार्यशैलीतून भुरळ घालणारे अधिकारी म्हणून विद्याधर महाले पाटील यांची ओळख आहे. ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू समजले जातात. फडणवीस यांचे खासगी सचिव (पीएस) म्हणून नव्या सरकारमध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. विद्याधर महाले हे आधीच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांचेच खाजगी सचिव होते. अतिशय प्रामाणिक व कष्टाळू अधिकारी म्हणून त्यांची ओळख असून, देवेंद्रजी फडणवीस यांचे ते अतिशय विश्वासू आहेत.

खाजगी सचिव

गेली अडीच वर्षे विद्याधर महाले पाटील हे उपमुख्यमंत्री राहिलेल्या देवेंद्र फडणवीस यांचे खाजगी सचिव होते. या काळात आपल्या कार्याने त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर विशेष अशी ओळख निर्माण केली. मंत्रालयात सकाळी 11 ते रात्री 7 वाजेपर्यंत त्यांची कॅबीन संपूर्ण महाराष्ट्रातून आपली गार्‍हाणी घेऊन आलेल्या नागरिकांनी भरलेली राहत असे. या दरम्यान महाले यांनी त्यांच्याकडे आलेल्या प्रत्येक नागरिकांची कामे व समस्या सोडविण्याचा पूर्ण प्रयत्न केला. विद्याधर महाले यांच्याकडे एखादा नागरिक समस्या घेऊन गेला आणि ती समस्या सोडविल्या गेली नाही, असे कधीच झाले नाही. त्यामुळे त्यांची ओळख ‘जनतेला भुरळ घालणारा अधिकारी’ म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर झाली.

केवळ मंत्रालयच नाही तर त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या कामाने आगळीवेगळी ओळख निर्माण केली आहे. आपली कर्तव्यनिष्ठा व संवेदनशीलतेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यातील ताईत बनण्यापूर्वी त्यांनी माजी मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते स्व. भाऊसाहेब फुंडकर यांच्यासह विनोद तावडे, सुभाष देशमुख व प्रवीण दरेकर यांचे खासगी सचिव म्हणून काम पाहिलेले आहे. चिखली विधानसभा मतदारसंघाच्या भाजपा आमदार श्वेता महाले यांचे ते पती आहेत. चिखलीसह बुलढाणा जिल्ह्याच्या आणि एकूणच विदर्भाच्या विकासात त्यांचे बारकाईने लक्ष असते.

Congress Politics : खरगे निवडतील काँग्रेसचा विधानसभेतील गटनेता!

वृत्तपत्र विक्रेते

विद्याधर यांचे वडील दयासागर महाले हे बुलडाणा येथे वृत्तपत्र विक्रेते होते. विद्याधर महाले स्पर्धा परिक्षेतून जिल्हा परिषदेत उपमुख्यकार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त झाले होते. नंतर प्रतिनियुक्तीवर त्यांनी भाजपाचे पांडूरंग फुंडकर, विनोद तावडे व प्रवीण दरेकर या तिन्‍ही विरोधी पक्ष नेत्यांचे खासगी सचिव म्हणून कार्यभार संभाळला होता. तत्कालीन शिक्षणमंत्री विनोद तावडे व सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे खासगी सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. विद्याधर महाले यांची मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव म्हणून नियुक्ती झाल्याने चिखली मतदारसंघातील नागरिकांच्या विकास कामांबाबतीत आशा पल्लवित झाल्या आहेत.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!