महाराष्ट्र

Assembly Session : चप्पल काढली, शपथ घेतली, वाकून केला नमस्कार

Sreejaya Chavan : आईच्या हातून लाऊन घेतला आमदारकीचा बॅज 

BJP MLA Oath : विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात शनिवारी (7 डिसेंबर) अनेक नवीन सदस्यांना आमदारकीची शपथ देण्यात आली. विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी विधानसभेच्या सदस्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यातील अनेक सदस्यांची शपथ लक्षवेधी ठरली. भाजपच्या नवनिर्वाचित उमेदवार श्रीजया अशोक चव्हाण यांच्या शपथविधीच्या क्षणही असाच लक्षवेधी ठरला.

हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी नाव पुकारल्यानंतर श्रीजया चव्हाण पोडियम जवळ आल्या. त्यानंतर त्यांनी पायातील चप्पल काढली. अनवाणी पायाने यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर त्या विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांच्या पिठापर्यंत गेल्या. त्यानंतर त्यांनी अध्यक्षांना वाकून नमस्कार केला. शपथ घेऊन झाल्यानंतर त्यांनी पुन्हा पायात चप्पल परिधान केली.

शपथविधी सोहळ्यानंतर श्रीजया चव्हाण यांना विधिमंडळ सचिवालयाकडून नियमाप्रमाणे सदस्यात्वाचा बॅज देण्यात आला. श्रीजया चव्हाण यांनी आपल्या आई अमिता चव्हाण यांच्या हातून हा बॅज लावून घेतला. श्रीजया भोकर विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीत विजयी झाले आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे विद्यमान खासदार अशोक चव्हाण यांच्या त्या कन्या आहेत. चव्हाण कुटुंबातून आमदार झालेल्या श्रीजया या चौथ्या व्यक्ती आहेत.

महाजनांचा वेगळेपणा

भाजपचे सदस्य तथा माजी मंत्री गिरीश महाजन यांनी घेतलेली शपथ देखील चर्चेत आहे. गिरीश महाजन यांनी संस्कृत भाषेतून शपथ घेतली. आपण यापूर्वी संस्कृत भाषेतून शपथ घेतली होती. त्यामुळे आपण यंदाही संस्कृत भाषेतूनच शपथ घेतल्याचे गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले. भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार वंदन करत आमदारकीची शपथ घेतली.

Devendra Fadnavis : ते आले अन् परदेशीही परतले

भाजपच्या एका आमदाराने चक्क भगवद्गगीता सोबत घेऊन आमदारकीचे शपथ घेतल्याने नवा वाद निर्माण झाला. सुरेश खाडे हे सांगली जिल्ह्यातील मिरज विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले. भगवद्गगीतेला साक्षी मानून त्यांनी आमदारीकीची शपथ घेतली. त्यांचा शपथ घेतानाचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी या शपधविधीवर आक्षेप घेत संताप व्यक्त केला आहे.

विजयानंतरच बांधला फेटा 

सलग तीन वर्ष निवडून येऊन हॅट्रिक करण्याच्या प्रयत्नात असलेले राजेश क्षीरसागर हे 2019 मधील निवडणुकीत पराभूत झाले. त्यांचा पराभव हा पुत्र ऋतुराज क्षीरसागर यांच्या जिव्हारी लागला होता. वडील पुन्हा आमदारकीची शपथ विधिमंडळात घेत नाहीत तोपर्यंत डोक्यावर फेटा चढवणार नाही, अशा शपथ ऋतुराज क्षीरसागर यांनी घेतली होती. राजेश क्षीरसागर यांनी विधिमंडळात आमदारकीची शपथ घेतल्यानंतर ऋतुराज पाटील यांनी डोक्यावर फेटा चढवला.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!