महाराष्ट्र

Maharashtra Government : फडणवीसांकडून पुन्हा ‘परदेशी’ याच नावाची निवड का? 

Devendra Fandnavis : प्रवीण परदेशींनंतर श्रीकर परदेशींना पसंती 

Importance Of Bureaucrats : सरकार कोणाचंही असो, चलती मात्र अधिकाऱ्यांची असते, असं म्हटलं जातं. ही बाब अजिबात खोटी नाही. महाराष्ट्रातील ज्या लोकांनी प्रशासकीय कामाच्या निमित्ताने मंत्रालयाच्या चकरा मारल्या असतील, त्यांना अधिकारी आणि बाबू दिग्गज मंत्र्यांनाही कसे नियमांच्या भुलभुलय्येमध्ये फिरवतात, याची चांगली जाणीव आली असेल. प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसमोर प्रसंगी प्रचंड अनुभवी मंत्री देखील हात टेकतात. याच प्रकाराला ‘लालफितशाही’ संबोधले जाते. मंत्री आणि अधिकारी असे ‘सुपर कॉम्बो’ जुळून आले तर काहीही होऊ शकते. असाच प्रकार महाराष्ट्राच्या राजकारणात दुसऱ्यांदा बघायला मिळणार आहे.

कालचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत. राज्याचा प्रमुख झाल्यानंतर सहाजिकच फडणवीस यांनी आपले सगळे हुकमाचे एक्के वर काढले आहेत. त्यातूनच एकेकाळी सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी पुरस्कार मिळवणारे श्रीकर परदेशी हे फडणवीसांचे मुख्य सचिव झाले आहेत. यापूर्वी फडणवीस जेव्हा पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले त्यावेळी प्रवीण परदेशी हे त्यांचे मुख्य सचिव होते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना ‘परदेशी’ या नावाचे इतके प्रेम का आहे? असा प्रश्न अनेकांना पडला असेल.

नाम मे क्या रखा है? 

‘नाम मे क्या रखा है, काम बोलना चाहिये’ असा वाक्प्रचार आपण ऐकला असेल. नेमके हेच समीकरण दोन्ही परदेशी यांच्या नियुक्तीच्या बाबतीत महत्त्वाचे ठरले आहे. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणात जसेजसे शक्तिशाली होऊ लागले, तसेतसे त्यांनी प्रभावीपणे काम करणारे सक्षम अधिकाऱ्यांची टीम हेरून ठेवली. यापूर्वी फडणवीस यांचे मुख्य सचिव राहिलेले प्रवीण परदेशी हे अमरावती महसूल विभागाचे विभागीय सचिव होते.

Devendra Fadnavis : ते आले अन् परदेशीही परतले

प्रवीण परदेशी यांच्या कामाचा आवाका प्रचंड होता. अमरावतीमध्ये काम करताना त्यांनी मेळघाटसह पश्चिम विदर्भातील आदिवासी आणि अविकसित भागांमध्ये प्रचंड काम केले. कुपोषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी ते स्वतः फिल्डवर उतरले. असं सांगितलं जातं की प्रवीण परदेशी यांच्या शासकीय वाहनाच्या मागे आणखी एक वाहन असायचे. या दोन्ही वाहनांमध्ये सर्व फाइल्स असायच्या. प्रवास करतानाही प्रवीण परदेशी हे तुंबलेल्या फाइल्स क्लिअर करायचे. विभागीय आयुक्त म्हणून अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील कलेक्टरशी प्रवीण परदेशी यांचा ‘वन टू वन कॉन्टॅक्ट’ असायचा.

सरकारने प्रवीण परदेशी यांना अमरावती विद्यापीठाचे प्रशासकीय कुलगुरू म्हणून नेमले. अमरावती विद्यापीठाचे तेव्हाचे कुलगुरू डॉ. मोहन खेडकर यांच्या विरोधात प्रचंड मोठे आंदोलन झाले होते. त्यामुळे तत्कालीन राज्यपालांनी डॉ. खेडकर यांना सक्तीच्या रजेवर पाठवले होते. त्यानंतर पदभार प्रवीण परदेशी यांच्याकडे आला. परदेशी यांनी अमरावती विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदा मोठ्या प्रमाणावर ‘कॅम्पस इंटरव्यू’ घेतले. अगदी भारतीय वायुसेनेतील अधिकारी देखील या मुलाखती घेण्यासाठी अमरावतीत आले होते. महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय असल्याने देवेंद्र फडणवीस या सर्व बाबी टिपत होते.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतात अशा सर्व अधिकाऱ्यांना फडणवीसांनी आपल्या टीम मध्ये सहभागी करून घेतले. या सगळ्यांचा कॅप्टन म्हणून प्रवीण परदेशी यांना मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव नेमले. त्यामुळे प्रशासनावर फडणवीस यांची पकड घट्ट झाली. तेव्हा मिळवलेली ही पकड आजपर्यंत कायम ठेवण्यात देवेंद्र फडणवीस यशस्वी झाले आहेत.

पुन्हा परदेशी का? 

प्रवीण परदेशी यांच्यानंतर आता मुख्यमंत्री होताच देवेंद्र फडणवीस यांनी श्रीकर परदेशी यांना मुख्य सचिव नेमले आहे. प्रवीण परदेशी यांच्याप्रमाणेच श्रीकर परदेशी हे देखील तितकेच कर्तबगार आहेत. पश्चिम विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये श्रीकर परदेशी यांनी जे काम केलं, त्याचे परिणाम आजपर्यंत सकारात्मकपणे बघायला मिळत आहेत. सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी पुरस्कारही त्यांना मिळाला. प्रवीण परदेशी यांच्याप्रमाणे श्रीकर परदेशी यांच्या कामाचा आवाका देखील तितकाच मोठा आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीकर परदेशी यांना दिल्लीमध्ये प्रतिनियुक्तीवर बोलावून घेतले होते. पंतप्रधान कार्यालयाचे उपसचिव म्हणून ते अनेक वर्ष दिल्लीमध्ये होते.

NCP Politics : प्रशांत पवारांनी राऊत, तिवारींना चांगलेच धुवून काढले !

महाराष्ट्रामध्ये परतल्यानंतर श्रीकर परदेशी यांना देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या टीममध्ये सहभागी करून घेतले. उपमुख्यमंत्री असताना परदेशी हे फडणवीस यांचे सचिव होते. आता तर ते मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिव झाले आहेत. मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव हे प्रसंगी राज्याच्या मुख्य सचिव असलेल्या व्यक्ती इतकेच पॉवरफुल असतात. आता तर श्रीकर परदेशी यांना केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्ही ठिकाणी कामाचा अनुभव आहे. त्यातल्या त्यात पंतप्रधान कार्यालयामध्ये अनेक वर्ष त्यांनी काम केल्यामुळे त्यांना कुठून काय करावे लागते याची पूर्ण ज्ञान आहे.

राजा पराक्रमी असला पाहिजे. कर्तबगार असला पाहिजे. कोणतेही युद्ध लढण्याची हिंमत त्याच्यात असली पाहिजे. राजाचा वजीर तितकाच हुशार आणि सेनापती तितकाच शूरवीर असला पाहिजे, असं आपण कथांमधून ऐकलं असेल. त्यामुळेच देवेंद्र फडणवीस यांना ‘नाम नही’ काम बोलना चाहिए’ अशा प्रकारात मोडणारे अधिकारी आपल्या टीममध्ये लागतात. विकास कामांच्या आड अनेकदा कायदे आणि नियम येतात. या सर्व कायदे आणि नियमांच्या अधीन राहून, प्रसंगी सुवर्ण मध्य मार्ग काढून विकास घडवून आणण्याची ताकद असणारे अधिकारी फडणवीस यांच्या टीममध्ये बघायला मिळतील. प्रवीण परदेशी हे असेच एक अधिकारी होते. आता श्रीकर परदेशी हेदेखील असेच एक अधिकारी ठरणार आहेत.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!