महाराष्ट्र

Puja Khedkar : न्यायालयीन लढा सुरूच; औरंगाबाद खंडपीठात याचिका 

UPSC Action : नॉन क्रिमिलिअर संबंधितचा अहवाल रद्द करण्याची विनंती

Aurangabad High Court : यूपीएससीने बडतर्फ केलेल्या पूजा खेडकर यांचा एका कोर्टातून दुसऱ्या कोर्टात न्यायालयीन लढा सुरूच आहे. पूजा खेडकर हिने औरंगाबाद उच्च न्यायालयात आणखी एक याचिका दाखल केली आहे. नॉन क्रिमिलिअर संबंधितचा अहवाल रद्द करण्याची विनंती पुजाने या याचिकेच्या माध्यमातून केली आहे. अहिल्यानगर जिल्हाधिकाऱ्यांचा नॉन क्रिमिलिअर संबंधितचा अहवाल रद्द करण्याची विनंती पुजाने कोर्टाला केली आहे. यासंबंधीची सुनावणी अहिल्यानगर जिल्हाधिकाऱ्यांकडून काढून ती अन्य जिल्ह्यात वर्ग करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

प्रशिक्षणार्थी आयएएस असताना पुजाने केलेल्या कथित गैरवर्तनाची तक्रार पुण्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडे केली होती. त्यानंतर पुजाची बदली वाशिम जिल्ह्यात करण्यात आली. या बदलीनंतर संघ लोकसेवा आयोगाने पुजासह अनेक उमेदवारांच्या कागदपत्र आणि तपशिलाची बारकाईने तपासणी केली. बोगस कागदपत्रांआधारे प्रशासकीय पदाचा फायदा लाटल्याचा तिच्यावर ठपका तिच्यावर ठेवण्यात आला. पुण्यातील गैरवर्तनानंतर एका पाठोपाठ पूजा खेडकर ही वादाच्या चक्रव्युहात अडकली.

न्यायालयाच्या चकरा

संघ लोकसेवा आयोगाने बडतर्फ केल्यापासून पूजा खेडकर आणि तिचा परिवार वेगवेगळ्या न्यायालयांच्या चकरा मारत आहेत. यूपीएससी ने केलेला कारवाईच्या विरोधात पुजाने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. नॉन क्रिमिलियर खटल्याप्रकरणी पुजाने औरंगाबाद हायकोर्टात धाव घेतली आहे. याशिवाय सुप्रीम कोर्टापर्यंतही तिचे प्रकरण गेले आहे. पूजा खेळकरच्या आई आणि वडिलांविरोधातही कारवाई सुरू आहे.

Mahavikas Aghadi : समाजवादी पार्टी एक्झिट करणार

युपीएससी परीक्षा देण्यासाठी अतिरिक्त संधी मिळावी, यासाठी पूजाने नावात बदल केला. शासनाची फसवणूक केल्याचे समोर आले. त्यामुळे तिला प्रशासकीय सेवेतून काढून टाकण्यात आले. पुढील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी तिच्यावर बंदी घालण्यात आली आहे. ओबीसी आरक्षण मिळावे यासाठी आई, वडिलांपासून विभक्त राहत असल्याची कागदपत्रं दिली होती. या सर्वांची छानणी झाली. त्यानंतर तिच्यावर विविध प्रकरणात गुन्हे नोंदवण्यात आले.बोगस अपंग प्रमाणपत्र मिळवून आरक्षण लाटल्याप्रकरणात पूजा खेडकर हिच्यावर युपीएससीने गुन्हा दाखल केला होता.

दाखल असलेल्या सर्व प्रकरणांमधून अटक टाळण्यासाठी सध्या पूजा खेडकर वेगवेगळ्या न्यायालयांमध्ये धाव घेत आहे. खेडकरने खोटी प्रमाणपत्र देत अनेकवेळा परीक्षा दिल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आलेला आहे. मुळशी तालुक्यातील जमिनीच्या वादात पूजा खेडकर हिची आई मनोरमा खेडकर यांनी समोरच्या व्यक्तीला पिस्तूल दाखवून धमकावले होते. त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाला होता. पुणे पोलीस आयुक्तांनी मनोरमा खेडकर यांच्या पिस्तुलाचा परवाना रद्द केला होता. हे प्रकरण न्यायालयात गेले असता, मुंबई हायकोर्टाने मनोरमा खेडकर यंचा पिस्तूल परवाना रद्द करण्याचा निर्णय फेटाळून लावला होता.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!