महाराष्ट्र

Mahavikas Aghadi : ‘आय लव्ह मारकडवाडी’ म्हणत महाविकासच्या नेत्यांची फलकबाजी !

Nana Patole : आता ठिणगी पडली, हा आग देशभर पोहोचणार

सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी या गावावरून सद्यस्थितीत राजकारण चांगलंच तापलं आहे. या गावातील लोकांनी ईव्हीएमवर अविश्वास दाखवला आणि पुन्हा मतदान घेण्याची मागणी केली होती. पण प्रशासनाने ही मागणी फेटाळून लावली. तेव्हापासून या गावात विविध घडामोडी घडत आहेत. जिल्हा प्रशासनाने या गावात जमावबंदीचा आदेशही लागू केला होता. 

मारकडवाडीवरून महाविकास आघाडीचा सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न आहे. आज (7 डिसेंबर) मुंबईत विशेष अधिवेशन सुरू आहे. यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आय लव्ह मारकडवाडी, असा फलक विधानभवन परिसरात झळकवला. यावेळी शिवसेनेचे आमदार (उद्धव ठाकरे गट) आदित्य ठाकरे, आमदार जितेंद्र आव्हाड, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार, उत्तर नागपूरचे आमदार डॉ. नितीन राऊत, यवतमाळचे आमदार बाळासाहेब मांगुळकर यांच्यासह महाविकास आघाडीचे इतर आमदार परिसरात एकत्र आले होते.

ठिणगी पडली..

मारकडवाडी या गावात शरद पवार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधीसुद्धा जाणार आहेत. राहुल गांधी या गावात लॉंग मार्च काढणार आहेत. इव्हीएमच्या विरोधात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देशभर लढा देण्याची तयारी चालवली आहे. मारकडवाडीसाठी अजून प्रोग्राम आलेला नाही. पण त्या अनुषंगाने नियोजन सुरू आहे. मताचा अधिकार वाचवण्याची जबाबदारी आमची आहे.

मारककडवाडीतून त्याची ठिणगी पेटली आहे. ती देशभरात पोहोचवण्याचा संकल्प काँग्रेस पक्षाने घेतला आहे. राहुल गांधी यांच्याशी माझं याबाबत बोलणं झालं आहे. असे नाना पटोलेंनी आज सकाळी नागपुरात पत्रकारांशी बोलताना सांगितले. या सगळ्या गोष्टींचा अभ्यास दिल्लीत सुरू आहे, बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी काम सुरू आहे, असंही पटोलेंनी सांगितलं.

Assembly Session : आघाडीच्या आमदारांनी घेतली नाही शपथ 

मारकडवाडीचा प्रयोग यशस्वी करून तो देशभर राबवण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न आहे. आघाडीच्या या प्रयत्नांना मात्र महायुतीच्या नेत्यांनी रडीचा डाव, असं म्हटलं आहे. लोकसभेमध्ये जेव्हा त्यांना मोठे यश मिळाले, तेव्हा ईव्हीएमचा मुद्दा कुणीही काढला नाही. आज विधानसभा निवडणुकीत आम्हाला घवघवीत यश मिळाले, तर ईव्हीएमचा मुद्दा काढून गळा फाडून आघाडीचे लोक ओरडत आहेत. जनतेने झटका दिल्यानंतर आता त्यांना न्याय-अन्याय सूतच आहे, अशी टीका महायुतीच्या नेत्यांनी केली.

भाजपसाठी लोकसभा होती महत्वाची..

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक भाजप आणि महायुतीसाठी महत्वाची होतीच. पण त्यापेक्षाही महत्वाची होती लोकसभा निवडणूक. जर भाजपला ईव्हीएमच्या माध्यमातून कारस्थान करायचेच होते, तर लोकसभा निवडणुकीतच केले असते. कारण देशात एकहाती सत्ता मिळवण्याचे भाजपचे स्वप्न होते. पण तसे झाले नाही. तर मागील निवडणुकीपेक्षा भाजपला या लोकसभा निवडणुकीत कमी जागा मिळाल्या. त्यामुळे ईव्हीएमद्वारे कुठलाही गोंधळ झालेला नसावा, असे जाणकारांचे मत आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!