महाराष्ट्र

Buldhana : आमदार गायकवाडांच्या आरोपात तुपकरांना वाटतय तथ्य 

Shiv Sena : हा तर पंख छाटण्याचा हा प्रकार; ‘या’ नेत्याची खासदार व आमदाराच्या वादात उडी

Political War : बुलढाणा विधानसभा मतदारसंघात 841 एवढ्या अत्यल्प मताधिक्याने विजयी झाल्यानंतर शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी त्यांच्याच पक्षातील केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आणि भारतीय जनता पक्षाचे आमदार डॉ. संजय कुटे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. आता या शिवसेनेतील अंतर्गत राजकीय द्वंद्वात शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी उडी घेतली असून गायकवाड यांनी केलेल्या आरोपात सत्यता असून हा सर्व घटनाक्रम मी अनुभवला आहे, अशी प्रतिक्रिया रविकांत तुपकर यांनी दिली आहे.

प्रतापराव जाधव आणि संजय गायकवाड यांच्यात सध्या आरोप प्रत्यारोपचा कलगीतुरा रंगला असताना शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी या वादात उडी घेतली. आमदार गायकवाड यांनी नामदार जाधव यांच्याविरोधात केलेले आरोप गंभीर असून त्यात तथ्य आहे. आपल्याच पक्षातील सहकाऱ्याचे पंख छाटण्याचा हा प्रकार असल्याचे सांगून तुपकरांची आगीत तेल ओतल्याचे चित्र आहे. विधानसभा निवडणुकीत ‘तटस्थ’ राहिल्यावर आणि निकाल लागून 13 दिवस उलटल्यावर तुपकरांनी आपले मौन सोडून राजकीय वर्तुळात पुन्हा धमाल उडवून दिली आहे.

रविकांत तुपकर म्हणाले..

आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या आरोपात सत्यता आहे. मी या सगळ्या घटना अनुभवल्या आहेत. उद्धव ठाकरे यांनी मला एबी फॉर्म देऊ केला. मात्र दोन तासात अनेक घडामोडी झाल्या आणि मला नकार देण्यात आला. शिवसेनेचे नेते अनिल परब देखील या सर्व घटना जाणून आहेत. मला बुलढाणा विधानसभेत उमेदवारी मिळाली असती तर प्रतापराव जाधवांना भविष्यात ते जड गेलं असतं. संजय गायकवाड हे खरं बोलणार व्यक्तिमत्त्व आहे, त्यांनी प्रतापराव जाधव यांच्यावर केलेले आरोप गंभीर आहेत. आपल्याच पक्षातील एक नेता पुढे जाऊ नये म्हणून कसं कारस्थान रचल जात हे संजय गायकवाड यांनी समोर आणलं आहे. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे महाविकास आघाडीला वाढलेला आत्मविश्वास नडला , त्यामुळे विधानसभेत यश मिळालं नाही. आमच्या सारख्या छोट्या घटक पक्षाना आघाडीने सोबत घेतलं नाही , नाहीतर चित्र वेगळं असतं, असेही रविकांत तुपकर म्हणाले.

विरोधात लढल्याचा राग – तुपकर

शिंदे गटातील हा वाद भडकला असतानाच रविकांत तुपकर यांनी आगीत तेल ओतण्याचे काम केले. बुलढाण्यात मोजक्या माध्यम प्रतिनिधी सोबत बोलताना त्यांनी, आमदार गायकवाड आणि आमच्यात वैचारिक मतभेद असले तरी त्यांनी केलेल्या गंभीर आरोपात तथ्य आहे. तसेही प्रतापराव जाधव यांना मी राजकारणात ‘कुठेच नको आहे,’ असे सांगून तुपकर म्हणाले की लोकसभा निवडणुकीत मी त्यांच्या विरोधात लढलो.याचा कदाचित त्यांना राग आहे.यामुळे माझी उमेदवारी ठरताच ठाकरे गटाचे पदाधिकारी, काँग्रेसचे एक आमदार एकत्र आले आणि काही तासातच बुलढाण्याची उमेदवारी जयश्री शेळकेंना जाहीर झाली असा दावा तुपकर यांनी बोलून दाखविला.

Assembly Elections : बुलढाण्यात 5 बुथच्या ईव्हीएमची होणार पडताळणी

गायकवाडांकडून मोठा गौप्यस्फोट

बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी एबीपी माझाशी बोलताना एक मोठा गौप्यस्फोट केला. आपल्याच पक्षातल्या नेत्यांनी निवडणुकीत गद्दारी केल्याचं गायकवाडांचं म्हणणं आहे. त्यांचा रोख होता तो शिवसेनेचे बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव आणि भाजपचे आमदार संजय कुटे यांच्याकडे. माझ्याच पक्षातील प्रतापराव जाधव यांनी मिलिंद नार्वेकरांना फोन करून माझ्या विरुद्ध तुपकर यांच्या ऐवजी जयश्री शेळके यांना उमेदवारी देण्याच सांगितलं. भाजपाच्या संजय कुटे यांनी कट रचून अनिल परब यांना संपर्क करून माझ्या विरोधात जयश्री शेळके यांना उमेदवारी दिली असा दावा संजय गायकवाडांनी केला.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!