महाराष्ट्र

MNS : चंद्रपूर जिल्हा बॅंकेत आरक्षण हटविणाऱ्यांविरोधात मनसे आक्रमक !

Chandrapur : नोकरीकरिता लाखो रुपये घेणाऱ्या संचालकांचे पितळ उघडे पाडणार

सर्वोच्य न्यायालयाच्या निर्देशांनुसार राज्य शासनाने मागासवर्गीयांना आरक्षण लागू करण्याचे परिपत्रक काढले. पण त्यानंतरही चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंकेच्या नोकर भरतीत ते आरक्षण लागू केले जात नाहीये. या नोकर भरतीमध्ये शेकडो परीक्षार्थ्यांकडून लाखों रुपये घेतले जात आहेत. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या हुशार विद्यार्थ्यांना यामुळे संधी मिळतं नसल्याची तक्रार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी केली आहे.

कुकडे यांनी सहकार आयुक्त, सहकार सचिव यांच्याकडे तक्रार केलेली आहे. या नोकर भरतीवर स्थगिती आणा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना परीक्षेसाठी फॉर्म भरणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना घेऊन मनसे स्टाईल आंदोलन करेल, असा इशारा देण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात एका याचिकेवर सुनावणी झाली. यादरम्यान बैंक भरती प्रक्रिया सुरु ठेवण्याचा जो आदेश मिळाला, त्यामुळे जिल्हा बैंक अध्यक्ष व संचालक आनंदात आहेत. हा आनंद मनसेच्या आंदोलनाने दीर्घकाळ टिकणार नाही, असे कुकडे यांनी म्हटलं आहे.

आरक्षणाची मागणी 

महाराष्ट्रभर आरक्षणाच्या नावावर मागील अनेक वर्षांपासून विशेषतः गेल्या 3 वर्षांपासून उपोषणे, मुक मोर्चे, काळ्या फिती लावून धिक्कार, कॉर्नर सभा घेतल्या जात आहेत. अखिल भारतीय ओबीसी महासंघ, विदर्भ बहुजातीय आरक्षण समिती, अनुसूचित जाती जमाती महासंघ, दलित पॅन्थर संघटना, आदिवासी संघटना, विमुक्त जातींसाठी असणाऱ्या अखिल भारतीय बंजारा संघटन समित्या, कोळी, हलबा, धनगर, धनगळ, मराठा महासंघ इत्यादी आरक्षणासाठी 100 % मध्ये हिस्सा मागत आहेत, असे सहकार आयुक्तांना दिलेल्या निवेदनात राजू कुकडे यांनी म्हटले आहे.

Amruta Fadnavis : पुन्हा मुख्यमंत्री होत असल्याने आनंद

स्वामीनाथन समिती अहवालातील स्वायता मुद्द्यावर आर्थिक सक्षमतेसाठी व विश्वसनियता टिकून राहण्यासाठी सहकारी संस्था, सहकारी बैका शासनाच्या अनुदानाचा लाभ घेत आहेत. 2022 च्या निकालात दुरुस्त्या सुचविल्या व त्यानुसार राज्य शासनाने 25 फेब्रुवारी 2022 ला एक परिपत्रक काढून जिल्हा बैंकेत आरक्षण लागू केले आहे. मग तो आदेश डावलून जर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक अध्यक्ष व संचालक हे लाखो रुपये परीक्षा देणाऱ्या उमेदवाराकडून घेत असतील. तर मग सरकार काय करत आहे, असा प्रश्न मनसेने केला आहे.

राज्य सरकारला जे अधिकार आहेत, त्याचा वापर करून ही नोकर भरती पारदर्शक करावी. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून जिल्ह्यातील ज्या विद्यार्थ्यांनी नोकर भरतीसाठी फॉर्म भरले त्या सर्वाना घेऊन मनसे स्टाईल आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!