Video Viral : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर विरोधी पक्षांकडून ईव्हीएमवर संशय व्यक्त केला जात आहे. अनेक मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी, निकालानंतर उमेदवारांना मिळालेली मतं शेअर करत ईव्हीएममध्ये घोळ असल्याचं म्हटलं जात आहे. अशातच सध्या सोशल मीडियावर ईव्हीएम टॅम्परिंगचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. त्यामध्ये, व्हिडिओ कॉलिंगद्वारे एका व्यक्तीशी ईव्हीएम हॅकिंगच्या मुद्द्यावरुन चर्चा सुरू असल्याचे दिसते. या व्हिडीओमुळे लोकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. दुसरीकडे निवडणूक आयोगाने या संदर्भात दाखल घेत व्हिडिओवर आता पहिल्यांदाच स्पष्टीकरण दिलं आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबर रोजी जाहीर झाला. या निकालात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. तर महाविकास आघाडीला मोठा झटका बसला. त्यानंतर सर्वत्र ईव्हीएम हॅक करण्याची चर्चा सुरु झाली. महाविकास आघाडीकडूनही ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित करण्यात आले. दरम्यान, सोशल मीडियावर ईव्हीएम हॅक करण्यासंदर्भातील एक व्हिडिओ व्हायरल झाला. व्हिडिओत अमेरिकन हॅकर सैयद शुजा असल्याचा दावा केला जात आहे. तो कोणाच्याही बाजुने निवडणूक निकाल लावू शकत असल्याचा दावा करत आहे. त्यासाठी त्याला व्हीव्हीपॅट मशिनचे नंबर मला हवेत. हे नंबर रिटेरिंग ऑफिसर देईल, असे तो म्हणतो.
अमेरिकेतील हॅकर सैयद शुजा याने अमेरिकेतील संरक्षण विभागाचे तंत्रज्ञान वापरुन ईव्हीएम हॅक करता येत असल्याचा दावा केला होता. सैयद शुजा याने ईव्हीएम हॅक करण्यासाठी 54 कोटींची मागणी केली होती. हॅकर व्हिडिओ कॉलिंगने व्यक्तीशी ईव्हीएम हॅकिंगच्या मुद्द्यावरुन बोलत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. त्यामुळे अखेर निवडणूक आयोगाने दखल घेत त्यावर पहिल्यांदाच स्पष्टीकरण दिले आहे.
त्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल
राज्य निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओतील दावे खोटे आहेत. हा सर्व प्रकार खोटा आणि अप्रमाणित आहेत. ईव्हीएम टँपरफ्रूफ आहे. कोणत्याही नेटवर्कसोबत त्याला जोडत येत नाही. मुंबई सायबर पोलिसांनी या व्हिडिओतील व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, असेही निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
Parinay Phuke : पटोले यांनी आधी साकोलीमध्ये मतपत्रिकेवर निवडणूक घेऊन दाखवावी
काय आहे व्हिडिओत?
व्हिडिओमध्ये अमेरिकन हॅकर सैयद शुजा असल्याचा दावा केला जात आहे. तो कोणाच्याही बाजुने निवडणूक निकाल लावू शकत असल्याचा दावा करत आहे. त्यासाठी त्याला व्हीव्हीपॅट मशिनचे नंबर मला हवेत. हे नंबर रिटेरिंग ऑफिसर देईल, असे तो म्हणतो. ईव्हीएम मशीन बंद असतानाही त्याचे ट्रन्समिशन करता येत असल्याचा दावा त्याने केला आहे. 6.55 मिनिटांचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओची चर्चा सोशल मीडियावर चांगली रंगली आहे. नेटकरी दोन्ही बाजूंनी दावे, प्रतिदावे करत आहे.