MVA Against EVM : महाविकास आघाडीतून निवडणूक आयोगावर हल्ले वाढले आहेत. पराभूत उमेदवारांनी आता फेर मतमोजणीचा पर्याय निवडला आहे. त्यासाठी मोठी रक्कमही मोजली आहे. माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पण मोठा बॉम्ब टाकला आहे. आपण सात सार्वत्रिक निवडणूक लढलो आहे. कार्यकर्ताना अंदाज येत असतो, असे ते म्हणाले.
लोकशाही वाचवण्यासाठी बाबा आढाव यांनी आंदोलन केलं. बाबा आढाव यांना काँग्रेस पक्षाच्या वतीने पाठिंबा देण्यासाठी आपण मुंबईहून पुणे येथे आल्याचे त्यांनी सांगितले. महाविकास आघाडीला पाचच महिन्यांपूर्वी मोठ्या जागा मिळाल्या होत्या. पण विधानसभेला इतका मोठा बदल होईल असं दिसत नाही, असे चव्हाण म्हणाले. पक्ष फुटीचा जो विषय झाला त्याचा काहीच फरक पडला नाही याचा विश्वास बसत नाही, असेही चव्हाण म्हणाले.
आयोगावर आरोप
द्वेष पसरवणारी भाषण मोदी योगी यांचे कडून करण्यात आली त्यांच्यावर कारवाई केली नाही. निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे. मतदान यंत्रांवर जनतेचा विश्वास राहिलेला नाही. व्हीव्हीपॅटच्या सर्वच्या सर्व चिठ्ठ्या मोजण्याची गरज आहे. सरकार घाबरत असल्यानेच जनतेचा संशय बळावत असल्याचा आरोप त्यांनी केला. मतदान यंत्रांची तपासणी करण्यासाठी निवडणूक आयोगाने आंतरराष्ट्रीयस्तरावर एक समिती नेमावी अशी मागणी देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
निवडणुकीत पोलिसांचा गैरवापर केला गेला. पोलिसांकडून मतदान करून घेतलं. केवळ पाच टक्के मत मोजून फायदा होणार नाही. मशीनमध्ये काही गुप्त कोड, प्रोगाम फीट केला आहे का? हे तपासावं लागणार आहे. आपण स्वतः 1952 पासून देशातील निवडणूक प्रक्रिया जळून पाहत आहोत. मात्र यंदाच्या निवडणुकीत जितक्या मोठ्या प्रमाणावर पैशांचा वापर झाला, तितका यापूर्वी कधीही झाला नव्हता, असा आरोपही पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. अदानींना अमेरिकेतली कोर्टात पकड वॉरंट काढलं आहे. निवडणुकीतील तांत्रिक दोष हा गौण विषय आहे. परंतु निवडणुकीमध्ये परकीय शक्तींचा हस्तक्षेप झाला आहे का, हे पाहणे गरजेचे असल्याचेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमधील मतदानातील तफावत सध्या कळीचा मुद्दा झाला आहे. अनेक गावात मतदारांपेक्षा मतदानाचा टक्का अधिक असल्याचे समोर आल्याने विरोधकांच्या संशयाला जागा मिळत असल्याचा दावा करण्यात येत आहे. 72 लाख मते कधी आणि कशी वाढली असा निशाणा नाना पटोले यांनी निवडणूक आयोगावर साधला आहे. अशातच होता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील निवडणूक आयोगावर संशय व्यक्त केला आहे.