महाराष्ट्र

Shiv Shiv : केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी शिवसैनिकांसमावेत बघितला “द साबरमती रिपोर्ट ” 

Prataprao Jadhav : विक्रांत मॅसी हा चित्रपट घेऊन आला आहे.

The Sabarmati Report : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून 20 नोव्हेंबरला सर्वत्र मतदानाची प्रक्रिया पार पडली. तर उद्या 23 नोव्हेंबर रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. या निवडणुकीत शिवसेनेचे स्टार प्रचारक म्हणून केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी राज्यभर प्रचार सभा घेतल्या. निवडणुकीच्या व्यस्ततेमधून थोड वेळ मिळाल्यानंतर गुरुवार 21 नोव्हेंबरला केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी शिवसैनिकांसमावेत मेहकर येथील सिनेमार्क टॉकीज मध्ये “द साबरमती रिपोर्ट” हा चित्रपट बघितला.

“द साबरमती रिपोर्ट “ह्या चित्रपटांमध्ये गुजरात येथील गोध्रा स्टेशनवर साबरमती एक्सप्रेसमध्ये बसलेल्या राम भक्ताच्या धक्कादायक हत्याकांडाची वास्तव कथा या चित्रपटांमध्ये दाखवण्यात आली आहे. गुजरातमधील गोध्रा हत्याकांडाविषयी अनेक भ्रामक गोष्टी समाजामध्ये पसरविल्या गेल्या आहेत. त्या हत्याकांडाविषयीची वास्तवता लोकांना आणि शिवसैनिकांना समजली पाहिजे, या दृष्टिकोनातून केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी आपल्या शिवसैनिकांसमावेत हा चित्रपट बघितला. गोध्रा हत्याकांडाचं वास्तव हे सर्वसामान्यांनाही सांगावे, असे आवाहन त्यांनी उपस्थित शिवसैनिकांना केले.

यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे मेहकर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ. संजय रायमुलकर, मेहकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माधवराव जाधव, युवा सेना जिल्हाप्रमुख ऋषिकेश जाधव शिवछत्रपती मंडळाचे अध्यक्ष नंदू मापारी माजी उपसभापती तुपे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Assembly Election : मतांची वाढती टक्केवारी कोणाच्या फायद्याची

काय आहे साबरमती एक्स्प्रेसची घटना 

‘द साबरमती रिपोर्ट’ या चित्रपटाची कथा सत्य घटनेवर आधारित आहे. ‘द साबरमती रिपोर्ट’ 27 फेब्रुवारी 2002 रोजी भारताच्या गुजरात राज्यातील गोध्रा रेल्वे स्थानकाजवळ साबरमती एक्सप्रेसमध्ये घडलेल्या भीषण घटनेवर आधारित आहे. गोध्रा घटनेबद्दल क्वचितच कोणाला माहिती असेल. अयोध्येहून निघालेल्या साबरमती एक्स्प्रेसच्या दोन बोगींना आग लागून झालेल्या अपघातात 59 निष्पापांना प्राण गमवावे लागले. या प्रकरणाचा तपास कमी आणि त्यावर राजकारण जास्त झाले. सत्य काय आणि काय दाखवले, ते उघड करण्यासाठी विक्रांत मॅसी त्याचा ‘द साबरमती रिपोर्ट’ हा चित्रपट घेऊन आला आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!