महाराष्ट्र

Assembly Election : उमरखेडमध्ये सरपंचाला केले रक्तबंबाळ

Yavatmal Politics : राजकीय वादातून मतदानाच्या दिवशी हल्ला

Political Clash : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले. राज्यातील सर्व 288 मतदारसंघांमध्ये मतदान पार पडले. काही ठिकाणी हिंसक घटनाही घडल्या. कुठे दोन पक्षांचे उमेदवार समोरासमोर आलेत. कुठे लोकप्रतिनिधींची पोलिसांसोबत बाचाबाची झाली आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यातील सुकळी (ज.) येथे सरपंचाला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण करण्यात आली..

भाजपचे सरपंच शिवाजी रावते यांच्यावर विशिष्ट समुदायाच्या तरुणांनी मतदान केंद्रावरच धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात रावते गंभीर जखमी झालेत. घटनेची तक्रार उमरखेड पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. हा हल्ला कोणी केला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. राजकीय वैरातून हा हल्ला झाल्याचा आरोप भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. सुकळी हे संवेदनशील गाव आहे. त्यामुळे ही घटना घडताच पोलिस तत्काळ गावात पोहोचले. या घटनेमुळे गावात काही काळ तणावाचे वातावरण होते.

शंभरावर उमेदवार

यवतमाळ जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघ आहेत. या मतदारसंघत 102 उमेदवार रिंगणात आहेत. बुधवारी मतदान पार पडताच सर्वच उमेदवारांनी स्वत:च्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. आता मतदार कोणाच्या पारड्यात विजयाचे मत टाकतात, हे शनिवारी स्पष्ट होईल. मतदान संपताच सर्वत्र कोण निवडून येईल, याचे अंदाज बांधणे सुरू झाले आहे. महायुती की महाविकास आघाडी, याची चर्चा गावागावांत रंगली आहे.

बुधवारी 20 नोव्हेंबरला सकाळी मतदान उत्साहात सुरू झाले. मात्र सकाळी दहा वाजेनंतर मतदान काहिसे मंदावले. दुपारी पुन्हा जोमाने मतदानाला सुरवात झाली. ग्रामीण भागात, शहरातील गजबजलेल्या मतदान केंद्रांवर मतदारांनी रांगा लावल्या होत्या. सायंकाळी पाच वाजेपर्यंत यवतमाळ विधानसभा मतदारसंघात 53.40 टक्के मतदान झालेत. आर्णीत 62.07 टक्के मतदान होते. दिग्रस मतदारसंघात 65.33 टक्के मतदान झाले. पुसदमध्ये मतदानाची टक्केवारी 57.72 होती. राळेगावमध्ये 67.75 टक्के मतदान झाले.

Sudhir Mungantiwar : राष्ट्रीय कर्तव्य बजावल्याबद्दल मतदारांचे मानले आभार 

उमरखेड मतदारसंघात टक्केवारी 60.38 होतर. वणीमध्ये 63.73 टक्के मतदान झाले. सर्वाधिक मतदान राळेगाव विधानसभा मतदारसंघात झाले आहे. सर्वांत कमी मतदान यवतमाळमध्ये झाले. मतदानादरम्यान काही किरकोळ घटना वगळता सर्वत्र शांततेत मतदान पार पडले. वणी विधानसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यापासून मतदानाची टक्केवारी वाढती राहिली. या मतदारसंघात लोकांमध्ये बऱ्यापैकी उत्साह दिसून आला.

वणीमध्ये सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान केंद्रांवर रांगा होत्या. त्यामुळे मतदानाची अंतिम आकडेवारी वाढण्याची शक्यता आहे. मतदानाच्या दिवशी हाणामारीच्या दोन घटना विदर्भात घडल्या आहेत. वर्ध्यात शरद पवार गटाचे नितेश कराळे यांना मारहाण झाली. उमरखेडमध्येही सरपंचाला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण झाली. काही ठिकाणी गैरप्रकार झाल्याचा आरोपही करण्यात आला.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!