महाराष्ट्र

Sudhir Mungantiwar : सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

Ballarpur Constituency : लोकशाहीचे हात मजबूत करण्याचे आवाहन

Maharashtra Assembly Election : राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनंगटीवार यांनी सहपरिवार मतदान केलं. चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले मुनगंटीवार बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप-महायुतीचे उमेदवार आहेत. सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी (20 नोव्हेंबर) दुपारी सहकुटुंब ईव्हीएमचं बटण दाबलं. चंद्रपुरातील सिटी हायस्कूलमध्ये त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्या पत्नी सपना मुनगंटीवार, जावई डॉ. तन्मय बिडवई, मुलगी डॉ. शलाका मुनगंटीवार-बिडवई त्यांच्यासोबत होते.

राज्यात बुधवारी एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाले. यावेळी वन व सांस्कृततिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार हे देखील लोकशाहीच्या उत्सवात संपूर्ण परिवारासह सहभागी झाले. महायुती सरकारने गोरगरिबांची सेवा केली आहे. महिलांचे आर्थिक सक्षमीकरण केले. युवकांच्या हाताला रोजगारावर भर दिला. त्यामुळे निवडणुकीत भाजप-महायुती ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्‍याने विजयी होईल, असा विश्वास त्यांनी मतदानानंतर चंद्रपुरातील सिटी हायस्कूलमध्ये व्यक्‍त केला.

महाउत्सव लोकशाहीचा 

मतदानाचा दिवस हा लोकशाहीचा सर्वांत मोठा उत्सव आहे. मतदान करणे सर्वांचा अधिकार आहे. त्याचा वापर लोकशाही बळकट करण्यासाठी करा. आपण सहकुटुंब मतदान केलं आहे, जनतेला आपण आवाहन करतो की, सर्वांनी मतदान करावं. सगळ्यांनी मतदानासाठी घराबाहेर पडलं पाहीजे, असं आवाहन देखील मुनगंटीवार यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला ‘विकसित भारत’ करण्याचा संकल्प केला आहे. विकासाच्या या महायज्ञात जनतेने मतदानाच्या रुपाने आहुती द्यायला हवी. जास्तीत जास्त प्रमाणात मतदान झालं पाहिजे. विधानसभा निवडणुकीच्या परीक्षेत आम्ही नक्कीच उत्तीर्ण होऊ, असा विश्वासही मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

Assembly Election : राज्यभरातील मतदानावर तिसरी नजर

बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार असलेले मुनगंटीवार हे प्रत्येक निवडणुकीत न चुकता मतदानाचा हक्क बजावतात. आजपर्यंतच्या जवळपास सर्वच निवडणुकीत ते परिवारासह मतदान करायला गेल्याचं बघायला मिळालं. मतदानाला निघण्यापूर्वी मुनगंटीवार यांना त्यांच्या परिवाराकडून घरी औक्षण करण्यात आलं. वेदमंत्र घोषात आचार्य ब्राह्मणांनी घरी पूजा केली. त्यानंतर मुनगंटीवार परिवारासह मतदान केंद्राकडं रवाना झालेत. घरातून बाहेर निघण्यापूर्वी आवर्जुन श्री महादेवांचे दर्शन घेतले. घरातील पितरांचे स्मरण करीत आशीर्वाद घेतला. याशिवाय भारतीय संविधानालाही मनापासून नमन केले. त्यानंतर मुनगंटीवार परिवार अत्यंत साधेपणाने मतदान केंद्रावर पोहोचला. नियमानुसार सर्व प्रक्रिया पार पाडत मुगनंटीवार परिवारातील सर्वांनीच मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर मुनगंटीवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!