महाराष्ट्र

Assembly Election :  भाजपला संथ मतदानाची भिती

BJP : मतदान प्रक्रियेचा वेग वाढविण्याची मागणी

BJP: लोकसभा निवडणुकीतील अनुभव लक्षात घेता 20 नोव्हेंबर रोजी मतदानादरम्यान मतदान केंद्रांवर मतदारांसाठी आवश्यक सोयी-सुविधांची व्यवस्था प्रशासनाने करावी अशी मागणी शहर भाजप पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मागील वेळेस मतदानाच्या संथ प्रक्रियेचा अनेक केंद्रांवर फटका बसला होता. यावेळी मतदानाचा वेग वाढविण्यावर भर देण्यात यावा, अशी भूमिकादेखील भाजप पदाधिकाऱ्यांनी मांडली आहे.

भाजपचे शहराध्यक्ष बंटी कुकडे, प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे, प्रदेश प्रवक्ते चंदन गोस्वामी यांनी ही मागणी केली. लोकसभा निवडणूकीदरम्यान अनेक केंद्रांवर अतिशय संथ प्रक्रिया सुरू होती. एकेका मतदाराला पाच मिनिटांची प्रक्रिया करावी लागत होती. त्यामुळे मतदार केंद्रांवर मतदारांच्या रांगा वाढत गेल्या.

अनेक ठिकाणी नागरिकांना एक ते दोन तास रांगांमध्ये थांबावे लागले होते. त्यामुळे कंटाळून बऱ्याच जणांनी मतदान न करता परत घर गाठले होते. याचा फटका मतदानाच्या टक्केवारीवर पडला व 55 टक्क्यांचा आकडादेखील गाठण्यात अपयश आले. आता परत जिल्हा प्रशासनाने मतदानाच्या डिस्टिंक्शनचा नारा दिला आहे. अशा स्थितीत मतदानाचा वेग वाढविण्यात यावा अशी मागणी भाजपकडून लावून धरण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या दिवशी अनेक मतदान केंद्रांवर पिण्याच्या पाण्याची, खुर्च्या, सावलीसाठी अनेक ठिकाणी शेड नव्हते. बूथवरील मतदार यादी व प्रत्यक्ष केंद्रातील मतदार यादी यात बरीच तफावत होती. बूथवरील यादीतील नावे मतदान केंद्रातील यादीत नव्हती. त्यामुळे मतदान केंद्रांवरून मतदान न करताच परतावे लागले होते.

गैरसोय..

ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग मतदारांची गैरसोय होऊ नये, याची काळजी प्रशासनाने घ्यायला घ्यावी. तसेच केंद्रांवर व्हील चेअर, रॅम्प, पिण्याचे पाणी, खुर्च्या, सावलीसाठी शेड असावे, अशीदेखील मागणी करण्यात आली.

Ballarpur Constituency: संतोष रावतची विनाशकाले विपरीत बुद्धी!

लोकांना घराबाहेर काढणे हीच कसरत!

सर्व पक्षांनी सकाळपासूनच लोकांना मतदानासाठी घराबाहेर काढण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. दुपारी २ पूर्वी जास्तीत जास्त मतदान झाले पाहिजे, असा सर्वांचा प्रयत्न असणार आहे. दुपारच्या सत्रात विशेषतः दुपारी एक ते दुपारी ४ या कालावधीत मतदानाचा वेग कमी होतो. तर शेवटच्या एक तासात वाढतो. पण दुपारच्याच सत्रात मतदानामध्ये खंड पडू नये यासाठी विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत. ज्या भागांमध्ये गरीब वस्त्या, झोपडपट्ट्या आहेत, तेथे मतदानाची गती दुपारच्या सत्रात संथ होऊ नये यासाठी सर्वच पक्षांनी विशेष तयारी ठेवली आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!