Ballarpur : 2011 मध्ये ‘डर्टी पिक्चर’ नावाचा एक सिनेमा आला होता. त्यामध्ये मुख्य नायिकेचा एक डॉयलॉग होता. तो म्हणजे ‘फिल्में सिर्फ तीन चिजों की वजह से चलती है. एन्टरटेन्मेंट, एन्टरटेन्मेंट और एन्टरटेन्मेंट’. विधानसभा निवडणूक – 2024 चं चित्रही असंच काहीसं आहे. फक्त येथे ‘एन्टरटेन्मेंट’ ची जागा ‘विकास’ने घेतली आहे.
ही निवडणूक विकास, विकास आणि फक्त विकास यावरच केंद्रित झाल्याचं दिसतंय. नागपूर, अमरावती, यवतमाळ, अकोला, चंद्रपूर असो की विदर्भातील आणखी कुठलाही जिल्हा असो, तेथे हाच अनुभव लोकांना येत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांना सांगण्यासाठी धड एकही काम नाही आणि बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील भाजप-महायुतीचे उमेदवार आणि राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या विकास कामांची यादी लांबलचक आहे. ही यादी आहे की हनुमानाचे शेपूट, असंही लोक म्हणतात.
गेल्या 30 वर्षांत मुनगंटीवार यांनी केलेल्या कामांची यादी वाचता वाचता दम लागतो. एवढी कामे त्यांनी केली आहेत. सत्तेत असताना तर त्यांनी विकासाची गंगाच आणली. पण सत्तेत नसतानाही विधिमंडळ सभागृहात त्यांनी जिल्ह्याचा आवाज बुलंद केला आणि कामे खेचून आणली. त्यांच्यातील याच क्वॉलीटीमुळे महाराष्ट्रभर त्यांचे चाहते आहेत. बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील लोकांच्या ओठांवरही ‘फक्त सुधीरभाऊ..’ एवढेच शब्द आहेत.
बुधवारी (13 नोव्हेंबर) सुधीर मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला. आज ज्या ज्या गोष्टींचा लाभ विरोधक घेत आहेत, ती प्रत्येक गोष्ट उपलब्ध करून असल्याचे मुनगंटीवार यांनी ठासून सांगितले. आणि यावर विरोधकांकडून काहीही प्रत्युत्तर आलेले नाही. कारण त्यांनी कामे केलीच नाही तर सांगणार काय, असा सवाल जनता उपस्थित करत आहे. विरोधकांकडून होत असलेला खोटा प्रचार आणि जातीपातीचे विष कालवण्याच्या त्यांच्या प्रयत्नांवर मुनगंटीवार कडाडले.
Sudhir Mungantiwar : ‘बाहुबली’पुढे कसे टिकतील बल्लारपूरचे ‘भल्लालदेव’?
कौतुकाचा वर्षाव
‘ज्या विश्रामगृहात तुम्ही बसता, ते मी बांधले. ज्या रस्त्यांवरून तुम्ही आज रॅली काढता, ते मी निर्माण केले. ज्या तहसील कार्यालयात अर्ज भरता, ते कार्यालय मी बांधले. जे पाणी तुम्ही पिता, ती योजनाही मीच केली. तरीही तुम्ही विचारता की, मी काय केले? आज जी दिसताहेत, ही विकासकामे नाहीत का, असा सवाल मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडीला केला आहे. विकासकामांचा आणखी कोणता पुरावा तुम्हाला हवा, असाही रोखठोक सवाल मुनगंटीवार यांनी विरोधकांना केला. दुर्गापूर येथील सभेत त्यांनी विरोधकांना चांगलेच धारेवर धरले. त्यांची विकासाची व्याख्या फक्त ‘कुटुंबाचा विकास’ एवढ्यावरच जाऊन थांबते, असा घणाघातही मुनगंटीवार यांनी केला.