Assembly Election : भारतामध्ये काँग्रेस नावाचा पक्ष सगळ्यात घातक आहे. याच काँग्रेसने भारत आणि पाकिस्तान असे देशाचे दोन तुकडे केले. याच काँग्रेसने आतापर्यंत जम्मू-काश्मीरचा प्रश्न चिघळत ठेवला. सुमारे 70 वर्षांपर्यंत देशातील लोकांवर कलम 370 लादून ठेवला. काँग्रेसच्या काळामध्ये पाकिस्तानातील दहशतवाद्यांकडून भारतावर सर्वाधिक हल्ले व्हायचे. आपल्या अनेक सैनिकांना प्राण गमवावे लागले. जेव्हा जेव्हा देशावर संकट आले त्यावेळी त्या त्या वेळी काँग्रेसचे राजपुत्र राहुल गांधी इटलीमध्ये पिकनिक साजरा करायचे, अशी घनाघाती टीका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली.
महायुती मधील उमेदवारांच्या प्रचारासाठी योगी यांनी वाशिम, अमरावती जिल्ह्यातील तिवसा आणि अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे जाहीर सभा घेतली. या सभांमधून त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. काश्मीर जळत होते, त्यावेळी काँग्रेसचे नेते दिल्लीत बसून पार्ट्या करायचे. कलम 370 हटवण्याचे धाडस सगळ्यात पहिले नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी दाखवले. त्यांना प्रचंड विरोध झाला. पण ही हिंमत फक्त त्यांनीच केली. त्यामुळे आज राहुल गांधी काश्मीरमध्ये जाऊन बर्फाच्या गोळ्यांची खेळू शकतात, असेही योगी म्हणाले.
रामाचाही न आले कामा
अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी संपूर्ण देशाने समर्पण दिले. मात्र राम मंदिराच्या उभारणीमध्ये सर्वाधिक अडथळे काँग्रेसनेच आणले. राम मंदिर उभारण्याची गरज काय, असा प्रश्नही काँग्रेसने केला. काँग्रेसची मजल तर इथपर्यंत गेली की त्यांनी राम आणि कृष्ण हे कधी झालेच नव्हते हे नवे संशोधन केले. सनातन हिंदू धर्माच्या भावना दुखावण्याचे काम नेहमीच काँग्रेसने केली आहे. हिंदू हा सहिष्णू आहे. त्यामुळे काँग्रेस त्यांच्याबद्दल वाटेल तसे बोलू शकते. अन्य कोणत्या धर्माबद्दल बोलण्याची हिंमत काँग्रेसमध्ये नाही. त्याचे कारण म्हणजे काँग्रेस मतांसाठी अशा लोकांचे पायही चाटायला मागेपुढे पाहणार नाही, अशी टीका योगी आदित्यनाथ यांनी केली.
Assembly Elections : नागपूर जिल्ह्यात 138 मतदान केंद्र संवेदनशील
अनेक वर्षांपर्यंत देशांमध्ये काँग्रेसची सत्ता होती. त्या वेळपर्यंत अनेक भागांमध्ये रस्ते नव्हते. पिण्याचे पाणी नव्हते. रेल्वे आणि मेट्रोचे जाळे नव्हते. पण आज काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत बारमाही रस्ते झाले आहेत. लोकांच्या घरामध्ये पिण्याचे पाणी पोहोचले आहे. आम्ही केवळ हिंदुत्वाच्या विषयावरच अडून बसलेलो नाही. मोदींनी देशाचा विकासही करून दाखवला आहे. आज अनेक देश भारतापुढे झुकत आहेत. त्याचे कारण म्हणजे भारतामध्ये बहुमताचे सरकार आहे. आतापर्यंत देशांमध्ये लंगडे सरकार होते. त्यामुळे काँग्रेस मनमानी पद्धतीने आपला उल्लू सरळ करून घेत होती. पण भाजपसाठी राष्ट्र आणि राष्ट्रीय अस्मिता हीच प्राथमिकता आहे. यासोबतच हिंदूंचे हित हे देखील महत्त्वाचे असल्याचे योगी आदित्यनाथ यांनी नमूद केले.
महाराष्ट्राची भूमी पावन
महाराष्ट्राच्या भूमीमध्ये अनेक संतांनी जन्म घेतला. या संतांनी महाराष्ट्राची भूमी पावन केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म देखील महाराष्ट्रामधीलच. शौर्य आणि तेजाचे प्रतीक म्हणून शिवाजी महाराजांकडे पाहिले जाते. शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर जगभरातील शिवप्रेमींची अस्मिता आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात येण्याचे सौभाग्य प्राप्त झाले यात आपण धन्यता मानतो, असे विचारही योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केले.