महाराष्ट्र

Assembly Election : अखेर राजू पारवे भाजपमध्ये!

Raju Parve : लोकसभेत व्हायचे ते विधानसभेत झाले; मात्र, वेळ निघून गेली

BJP : लोकसभा निवडणुकीत रामटेकमधून लढायची संधी मिळेल म्हणून राजू पारवे काँग्रेसमधून भाजपत येणार होते. पण शिवसेना रामटेकची जागा सोडायला तयार नव्हते. म्हणून राजू पारवे सेनेत दाखल झाले आणि पराभूत झाले. आता विधानसभेत तरी उमरेडमधून संधी मिळेल असे त्यांना वाटले. पण भाजप उमरेडची जागा सोडायला तयार नव्हते. म्हणून सुधीर पारवेंना उमेदवारी गेली. लोकसभा गेली आणि विधानसभेतही संधी हुकली. आता अखेर त्यांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश घेतला.

रामटेक लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. गेल्या दोन निवडणुका शिवसेनेचे कृपाल तुमाने जिंकले. आता त्यांना उमेदवारी द्यायची नाही, अशी भूमिका भाजपने घेतली. त्यामुळे दुसरा चेहरा शोधायला सुरुवात झाली. राजू पारवे काँग्रेस सोडायला तयार होते मात्र त्यांना भाजपमध्ये यायचे होते. भाजपने तसेही रामटेक लोकसभा आपल्याकडे यावी म्हणून प्रयत्न सुरू केले होते. मात्र शिवसेना ऐकायला तयार नव्हती. अनेक वर्षांपासून रामटेक लोकसभेत शिवसेनेचाच झेंडा आहे. त्यामुळे आता भाजपला दिल्यास एक महत्त्वाचा मतदारसंघ हातून जाईल, अशी भीती शिवसेनेला होती.

उपयोग काय..

शिवसेना कृपाल तुमाने यांना घरी बसवायला तयार होती, पण ही जागा भाजपला सोडण्याची तयारी नव्हती. अखेर राजू पारवे यांची समजूत काढण्यात आली. त्यांना भाजपऐवजी शिंदे सेनेत प्रवेश घेण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी उमेदवारी अर्ज भरायच्या अवघ्या काही चार दिवसांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांचे कार्यक्षेत्र उमरेड होते आणि रामटेक लोकसभेत सहा विधानसभा मतदारसंघ येतात. अवघ्या दहा दिवसांत एवढा मोठा मतदारसंघ पालथा घालून आपली ओळख निर्माण करणे त्यांच्यासाठी आव्हानात्मक होते. दुसरीकडे काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे देखील नवखे होते. मात्र त्यांच्या पाठिशी सुनील केदार यांची यंत्रणा होती. पारवेंसाठी पंतप्रधान मोदी यांची सभा झाली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तीनवेळा आले. पण त्याचा उपयोग झाला नाही.

Vanchit Bahujan Aghadi : आरक्षण, मंडल आयोग, मोफत शिक्षण, मोहम्मद पैगंबर बिल जाहीरनाम्यात 

आता राजू पारवेंना किमान उमरेडमधून तरी विधानसभा लढण्याची संधी मिळेल, असे वाटले होते. पण हा मतदारसंघ गेली अनेक वर्षे भाजपकडे आहे. त्यामुळे भाजपने ही जागा सोडायला नकार दिला. अखेर सुधीर पारवेंना उमेदवारी मिळाली. या संपूर्ण घटनाक्रमात राजू पारवेंची फरपट झाली. त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आणि भाजपला धक्का दिला. पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः यामध्ये मध्यस्थी केली. राजू पारवेंची पुन्हा समजूत काढली. त्यांनी अर्ज मागे घेतला आणि मंगळवारी फडणविसांच्याच उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. 

सुधीर पारवेंसाठी प्रचार करणार

राजू पारवे अपक्ष लढल्यास भाजपचे नुकसान होणार होते. आता ते स्वतःच भाजपमध्ये आल्यामुळे सुधीर पारवेंची ताकद वाढणार आहे, असा विश्वास भाजप नेत्यांना आहे. त्यामुळे आता भाजपचे उमेदवार सुधीर पारवे यांच्यासाठी प्रचार करताना राजू पारवे मैदानात दिसणार आहेत.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!