महाराष्ट्र

Nagpur : बंडखोरांमुळे काँग्रेस नेत्यांची दिवाळी मनधरणीतच

Assembly Election : किती यश मिळणार?; दुपारी तीन वाजता होणार स्पष्ट

BJP :देशभरात दिवाळीची धूम असली तरी महाराष्ट्रातील काँग्रेस नेते मात्र बंडखोरीच्या फुटलेल्या फटाक्यांमुळे त्रस्त झाले आहेत. मागील चार दिवसांपासून काँग्रेसचे वरिष्ठ नेते सातत्याने बंडखोरांच्या मनधरणीचे प्रयत्न करीत आहेत. आता किती बंडखोरांंमधील किती बार फुसके करण्यात त्यांना यश येते हे सोमवारी दुपारी तीन वाजेपर्यंत स्पष्ट होणार आहे.

अपक्ष अर्ज

एकट्या नागपूर जिल्ह्यात काँग्रेसकडून अनेकांनी अपक्ष अर्ज दाखल केले आहेत. त्यात प्रामुख्याने काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक (रामटेक), अमोल देशमुख (सावनेर), पुरुषोत्तम हजारे (नागपूर-पुर्व), याज्ञवल्क्य जिचकार व राजश्री जिचकार (काटोल), मिलींद सुटे-दर्शनी धवड-शशिकांत मेश्राम (उमरेड), चंद्रपाल चौकसे (रामटेक) यांचा प्रामुख्याने समावेश आहे. त्यामुळे महाविकासआघाडीच्या अधिकृत उमेदवारांसमोर अडचण निर्माण झाली आहे.

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात बंडखोरी करणाऱ्या काँग्रेसच्या उमेदवारांना पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेंनिथला व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वतः फोन केले. पक्ष हितासाठी यावेळी माघार घ्या, आपली दखल घेतली जाईल व भविष्यात योग्य पुनर्वसन केले जाईल असे आश्वासन दिले. तर काहींना पक्षाने त्यांना आजवर जे काही दिले त्याची आठवणही करून दिली.

बंडखोरांचे मन वाढविण्यासाठी काँग्रेस नेत्यांची फौज दिवसभर सक्रिय होती. अखिल भारतीय काँग्रेस समितीचे महासचिव मुकुल वासनिक नागपुरात दाखल झाले. त्यांनी काही बंडखोरांशी संपर्क साधला. राष्ट्रीय सचिव अविनाश पांडे यांनीही हाय कमांडने सोपविलेली जबाबदारी पार पाडत बंडखोरांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी समजूत काढली. तर काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी पूर्व व मध्य नागपुरातील काँग्रेसच्या बंडखोरांची संपर्क साधला व त्यांना पक्ष हितासाठी माघार घेण्याची विनंती केली.

Nagpur : भाजपसाठी मध्य, दक्षिण ‘चॅलेंजिंग’!

बंडखोरी मागे घेण्याचे गिफ्ट?

नाराज नेत्यांना बंडखोरी मागे घेण्याचे कोणते गिफ्ट देण्याचे आश्वासन दिले जात आहे, याबाबत गुप्तता पाळण्यात आली आहे. काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळाले होते. त्यामुळे आता विधानसभेतही मतदार आपल्याला साथ देईल, असा विश्वास काँग्रेसला आहे. अशात बंडखोरीमुळे गणीत बिघडू नये यासाठी वेगळी तयारी नेत्यांनी करून ठेवली आहे. ती तयारी नेमकी काय आहे, हे मात्र अद्याप कळू शकलेले नाही. अनिस अहमद यांना मध्य नागपुरात बंटी शेळकेंसाठी काम केल्यास विधानपरिषदेत पाठवू असे आश्वासन दिल्याचे कळते. मात्र इतरांना कोणती आश्वासने काँग्रेसने दिली आहेत, हे वेळ आल्यावरच कळेल.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!