महाराष्ट्र

Akola West : सत्य लपवण्यासाठी म्युझिक वापरत व्हिडीओचा गैरवापर 

Shiv Sena : मिश्रा म्हणतात, सिंधी कॅम्पमधील आंदोलनाचा प्रत्येक जण साक्षीदार

Assembly Election : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी चुरशीची होत असताना भाजपकडून व्हायरल झालेल्या एका व्हिडीओवर शिवसेनेने आक्षेप घेतला आहे. या व्हिडीओमध्ये अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार साजिद खान पठाण आणि शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजेश मिश्रा एकत्र दिसतात. साजिद खान आणि राजेश मिश्रा हे भाई भाई असल्याचा व्हिडीओ अकोल्यात व्हायरल झाला. त्यानंतर मिश्रा यांनी हा व्हिडीओ बनावट असल्याची बाजू मांडली. 

कोणाचा व्हिडिओ 

व्हिडीओमध्ये साजिद खान पठाण आणि आपण दिसत आहोत ही वाट सत्य आहे. परंतु हा व्हिडीओ अकोल्यातील सिंधी कॅम्प परिसरातील आहे. या भागातील बांधकाम पाडण्यात येत होते. त्यावेळी परिसरातील व्यापाऱ्यांनी बोलावल्याने आपण तेथे गेलो. काही मुस्लिम समाजातील व्यापाऱ्यांचेही बांधकाम पाडण्यात येणार होते. त्यामुळे त्यांनी साजिद खान पठाण यांना सिंधी कॅम्प येथे बोलावले होते. त्यामुळे एकाच वेळी आम्ही दोघेही तेथे दिसणे स्वाभाविक होते. हा व्हिडीओ व्हायरल करताना जाणीवपूर्वक म्युझिकचा वापर करण्यात आला आहे. ज्यामुळे आपण काय बोलत आहोत हे लोकांना कळणार नाही असा प्रतिहल्लाही मिश्रा यांनी केला.

प्रचंड चुरस 

संपूर्ण पश्चिम विदर्भात सध्या अकोला पश्चिम आणि अमरावती जिल्ह्यातील निवडणूक चांगलीच गाजत आहे. याशिवाय बुलढाणा विधानसभा मतदारसंघातही दोन नेत्यांमधील वाद चांगलाच रंगला आहे. सध्या अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील राजकीय लढत प्रचंड चुरशीची होत आहे. भाजपचे विजय अग्रवाल हे साजिद खान पठाण यांना मदत करतात हे सिद्ध करण्यासाठी अनेक जण धडपड करीत आहेत. दुसरीकडे साजिद खान पठाण आणि राजेश मिश्रा हे सोबत असल्याचं दाखवून देण्यासाठी वेगवेगळे पुरावे शोधले जात आहेत. या परिस्थितीत एकमेकांवर बेछूट आरोप करण्याचा प्रकार अकोल्यात सुरू झाला आहे.

विजय अग्रवाल यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाकडून त्यांचे कार्टून व्हायरल करण्यात आले होते. त्यानंतर महापालिकेच्या सभागृहाला दिलेल्या टिपू सुलतान नावाचा मुद्दाही प्रचारात वापरला गेला. आता भाजपनं राजेश मिश्रा आणि साजिद खान पठाण यांना रडारवर घेतलं आहे. भाजपकडून एकच व्हिडीओ व्हायरल करण्यात आला. मात्र त्याची चर्चा गावभर झाली. असे असले तरी या व्हिडीओमध्ये वापरण्यात आलेल्या म्युझिकमुळे राजेश मिश्रा आणि साजिद खान पठाण नेमके काय बोलत आहे हे लोकांपर्यंत पोहोचलीच नाही.

BJP Attack : साजिद, राजेश मिश्रा एकाच नाण्याच्या दोन बाजू

आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या या फैरी आणखी तीव्र होतील, यात शंकाच नाही. सध्या अकोला मतदारसंघात चौरंगी लढत कायम आहे. विजय अग्रवाल, हरीश अलीमचंदानी, राजेश मिश्रा यांच्यात काट्याची टक्कर सुरू आहे. वंचित बहुजन आघाडीचे डॉ. झिशान हुसेन आणि प्रहार जनशक्ती पार्टीचे डॉ. अशोक ओळंबे यांच्या बंडखोरीनेही निवडणुकीत रंगत आणली आहे. त्यामुळे अकोला पासून विधानसभा मतदारसंघात मतांचे विभाजन कसं होणार आणि कोणाला विजय मिळणार याची उत्सुकता साऱ्यांनाच आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!