Voting : विधानसभा निवडणुकीसाठी इलेक्ट्रॉनिक व्होटर मशिनवर (ईव्हीएम) येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. स्ट्राँग रूममधून मतदान केंद्रांवर मशीन नेताना आणि मतदान झाल्यानंतर मशीन पुन्हा स्ट्राँग रूमपर्यंत आणून जमा करणार्या वाहनांवर जीपीएस (ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम) ही ट्रॅकींग सिस्टीम बसविण्यात येणार आहे. त्यामुळे वाहन कोणत्या मार्गाने कसे, कोठे गेले, कोठे थांबले, त्याची सविस्तर माहिती निवडणूक विभागाकडे असणार आहे. त्यामुळे ईव्हीएममध्ये घोळ असल्याचा दावा करता येणार नाही, असे निवडणूक अधिकार्यांनी म्हटले आहे.
20 नोव्हेंबरला मतदान
विधानसभेसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. त्यासाठी वापरण्यात येणारे मतदान यंत्र अर्थात ईव्हीएमवर करडी नजर ठेवण्यासाठी यंत्र वाहतूक करणाऱ्या वाहनांना जीपीएस (ग्लोबल पोजेसिंग सिस्टिम) बसविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर दोन टप्प्यात प्रशिक्षण देण्यात येणार आहे. निवडणूक यंत्रणेत यापूर्वी जीपीएस प्रणालीचा वापर केला जात नव्हता, तो यंदा लोकसभा निवडणुकीपासून केला आत आहे. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना आता थेट नियंत्रण ठेवता येणे शक्य द्वराले आहे. एसटी महामंडळाकडील सुसज्ज बसेस या ईव्हीएम व कर्मचाऱ्यांसाठी घेतल्या जाणार आहे.
या बसेसला महामंडळाची जीपीएस यंत्रणा आहे; परंतु तरीदेखील जिल्हा प्रशासनाच्यावतीने एक स्वतंत्र जीपीएस बसविले जाणार आहे. रस्त्याने जाताना किंवा येताना बस बंद झाली किंवा मशीनमध्ये बिघाड झाला तर जीपीएसमुळे तात्काळ मदत शक्य होणार आहे. या निवडणुकीत ही आहेत वैशिष्ट्य निवदणूक प्रक्रियेतील महत्वाच्या वाहनांना जीपीएस, आधारसंहिता भंगाच्या तयारीसाठी सी व्हिजिल अॅप, सर्व परवाने ऑनलाइन आणि ज्येष्ठ नागरिकांना चरूत्र मतदान या २०२४ मधील लोकसभा निवडणुकीतील महत्वाच्या सुविधा आहेत.
कंट्रोल रूम तयार होणार
जीपीएससाठी स्वतंत्र कंट्रोल रूम तयार केला जाणार आहे. या कंट्रोल रूमचे नियंत्रण कोणाकडे ठेवायचे है अजून निश्चित झालेले नाही यासंदर्भाच्या नियोजनासाठी जिल्हा प्रशासन, पोलिस व आरटीओ यांची संयुक्त बैठक होणार आहे. त्यात बसेसची संख्या, जीपीएस व कंट्रोल रूम यावर शिक्कामोर्तब होईल
सर्वच मतदान केंद्रांसाठी ईव्हीएमच्या सुरक्षेसाठी जीपीएस सिस्टीम जिल्ह्यातील सर्वच मतदान केंद्रांसाठी ईव्हीएम यंत्रे पाठविली जाणार आहेत. मतदान झाल्यानंतर ते पुन्हा ठिकठिकाणच्या स्ट्राँगरूममध्ये जमा केले जाणार आहे. ईव्हीएमची ने-आण करणार्या वाहनांवर जीपीएस सिस्टीम बसविण्यात आली आहे. त्यामुळे वाहन ठरलेल्या मार्गावरून ये-जा करून वेळेत दाखल होतील. निवडणूक कार्यालयातील डॅश बोर्डवरून प्रत्येक वाहनांवर लक्ष ठेवले जाणार आहे. एखादे वाहन वेगळ्याच मार्गाने जात असल्यास लगेच स्वतंत्र पथकामार्फत त्यांची तपासणी केली जाईल. परिणामी, ईव्हीएमची सुरक्षा राखणे सुलभ होणार आहे, असे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी सांगितले.