महाराष्ट्र

Diary of a Home Minister : मी पाठमोरा आणि पाठीत तीन खंजीर!

Congress : अनिल देशमुखांच्या कल्पनेतील मुखपृष्ठ वेगळेच होते; ‘डायरी’तल्या नोंदी

Anil Deshmukh : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे ‘डायरी ऑफ ए होम मिनिस्टर’ हे पुस्तक सध्या चांगलेच चर्चेत आहे. विशेषतः मनसुख हिरेनचा मृत्यू, मनी लॉन्ड्रिंग प्रकरण, फडणविसांवरील आरोप आदींमुळे त्याची चर्चा जास्त होत आहे. हे पुस्तक ऑनलाईन खरेदीसाठी उपलब्ध देखील झाले आहे. पुस्तकाच्या मुखपृष्ठावर अनिल देशमुख यांचा फोटो, भारताचे राष्ट्रचिन्ह आणि महाराष्ट्राचा नकाशा आहे. मात्र देशमुखांच्या मनातील मुखपृष्ठ वेगळेच होते. त्यांनी पुस्तकातील एका लेखामध्ये त्याचा उल्लेख केला आहे.

14 महिन्यांचा तुरुंगवास

अनिल देशमुख यांनी काही दिवसांपूर्वीच डायरी ऑफ ए होम मिनिस्टर या पुस्तकाची माहिती माध्यमांना दिली होती. यामध्ये ‘14 महिन्यांचा तुरुंगवास’ आणि तुरुंगापर्यंत जाण्यापासून बाहेर पडण्यापर्यंतचा प्रवास राहील असं ते म्हणाले होते. त्याचवेळी देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट हल्ला पुस्तकातून होईल, हे निश्चित होते. त्यानुसार काही दिवसांपूर्वी त्यांनी पटकथेचे मुख्य पात्र देवेंद्र फडणवीस असल्याचे सांगितले. तेव्हापासून उत्सुकता चांगलीच ताणली गेली होती.

गेल्या आठवड्यात त्यांनी पुस्तकातील काही भाग ‘एक्स’वर पोस्ट केले आणि खळबळ उडवून दिली. यात फडणविसांवर थेट आरोप करण्यात आले आहेत. शिवाय तुरुंगातील टरबुज्या नावाच्या उंदीराबद्दलही त्यांनी सांगितले आहे. अनिल देशमुख यांनी पुस्तकातील काही विशिष्ट्य भाग सोशल मीडियावर पोस्ट केले खरे. पण संपूर्ण पुस्तकात त्यांनी भाजपच्या केंद्रातील आणि राज्यातील सरकारवर जोरदार टीका केली आहे. तपास यंत्रणांना हाताशी घेऊन खेळ केला जातो, असा आरोप त्यांनी केला आहे. अशाच एका भागात त्यांनी पुस्तकाच्या मुखपृष्ठाविषयी लिहिलेलं आहे.

सध्याच्या मुखपृष्ठावर अनिल देशमुख यांचे छायाचित्र, भारताचे राष्ट्रीय चिन्ह आणि महाराष्ट्राचा नकाशा आहे. मात्र, ही आपली कल्पना नव्हती, असं देशमुख लिहितात. ‘इतर दिवसांच्या तुलनेत आज मी जरा जास्तच प्रसन्न आणि उत्साहात होतो. माझ्या पुस्तकाच्या मुखपृष्ठासाठी मी एक रफ स्केच केलं होतं. मी काही सराईत चित्रकार नव्हतो, तरीही माझ्या कल्पनेच्या अनुषंगाने मी मुखपृष्ठासाठीचं चित्र काढलं होतं. माझ्या या मूळ चित्र-कल्पनेचा आधार घेऊन एखादा व्यावसायिक चित्रकारच मुखपृष्ठ तयार करणार होता. पण पुस्तकाच्या मुखपृष्ठावर काय हवं ते माझ्या डोक्यात पक्कं होतं.’

अशी होती कल्पना

‘मी पाठमोरा उभा आहे आणि माझ्या पाठीत तब्बल तीन खंजीर खुपसलेले आहेत. माझ्या पाठीत हे तीन खंजीर खुपसणारे लोक म्हणजे देवेंद्र फडणवीस, परमबीर सिंह आणि सचिन वाझे!’ असं अनिल देशमुख सांगतात.

Assembly Election : ती बॉडी मनसुख हिरेनची आहे, हे फडणविसांना माहिती होते

प्रकाशक नाही म्हणाले

‘माझं पुस्तक जवळजवळ लिहून पूर्ण झालं होतं. त्यामुळेच मी थेट मुखपृष्ठासाठी काय बरं करता येईल याचा विचार करण्यापर्यंत पोचलो होतो. माझ्या कल्पनेतील मुखपृष्ठावरचं चित्र प्रकाशकांना पसंत पडलं नाही ही वेगळी गोष्ट. त्यांनी दुसरं मुखपृष्ठ करून घेतलं. आता तेच पुस्तकावर आहे’, असंही अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!