महाराष्ट्र

Devendra Fadnavis : राज ठाकरेंबाबत उपमुख्यमंत्री म्हणाले..

MNS Politics : महायुतीत येण्याबाबत ‘स्कोप’ नसल्याचं स्पष्टीकरण

Stand Of BJP : राज्यात महायुतीचं सरकार येईल. मुख्यमंत्री भाजपचा होईल. 2029 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मुख्यमंत्री होईल असं वक्तव्य मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केलं. आपण सांगत असलेले लिहून ठेवा, असंही त्यांनी ठामपणे नमूद केलं. त्यामुळे राज ठाकरे यांची मनसे महायुतीमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं. देवेंद्र फडणवीस हे नक्कीच मुख्यमंत्री होऊ शकतात, असंही राज ठाकरे यांनी नमूद केलं. त्यानंतर राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीचे फोटो व्हायरल झाले. त्यामुळं मनसे महायुतीत सहभागी होण्याच्या चर्चांनी आणखी जोर धरला. आता याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे.

नागपूर येथे आगमन झाल्यानंतर गुरूवारी (31 ऑक्टोबर) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भाजपाबरोबर युती करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पुढील मुख्यमंत्री भाजपाचा असेल. आम्ही महायुतीबरोबर जाण्याचा पर्याय निवडू, असंही राज ठाकरे म्हणाले होते. त्यामुळं ठाकरे यांना महायुतीत घेणार का, यावर फडणवीस बोलले. देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘राज ठाकरे हे आमचे मित्र आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांनी आम्हाला बिनशर्त पाठिंबा दिला. यावेळी त्यांची भूमिका वेगळी आहे. त्यांनी अनेक जागांवर उमेदवार उभे केले आहेत.’

MNS Akola : प्रशंसा अंबेरे यांच्या कार्यालयावर हल्ला

सोबत घेण्याबाबत फूलस्टॉप?

प्रतिक्रिया व्यक्त करताना फडणवीस म्हणाले की, ‘राज ठाकरे यांचे उमेदवार महायुतींच्या उमेदवारांविरोधात लढणार आहेत. भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यासोबत रिपाइं, जनसुराज्य आणि इतर लहान पक्ष अशी महायुती आहे. मनसेने इतर वेगवेगळ्या ठिकाणी उमेदवार उभे केल्याने ते महायुतीत येतील असा कोणताही स्कोप नाही.’ निवडणुकीतील मतदानाबाबतही फडणवीस यांनी स्पष्टपणे आपलं मत व्यक्त केलं. महायुतीचं सरकार येईल आणि महायुतीचाच मुख्यमंत्री होईल, असा विश्वास त्यांनी ठामपणे व्यक्त केला. 

माघार घ्यायला लावणार नाही..

मनसेच्या उमेदवारांबाबतही त्यांनी मत व्यक्त केलं. मनसे त्यांच्या उमेदवारांना माघार घ्यायला लावणार नाहीत. विधानसभा निवडणुकीत यंदा तरी आम्ही समोरा-समोर लढत आहोत. हे चित्र आता स्पष्ट आहे. महायुती एकीकडे आहे. मनसे वगैरे इतर पक्ष स्वतंत्रपणे लढत आहेत. एखाद-दुसऱ्या जागी मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने मनसेला मदत करण्यासाठी विचारू केला जाऊ शकतो. शिवडीसारख्या जागेवर मुख्यमंत्र्यांनी एक भूमिका घेतली आहे. पण आता आपण स्पष्टपणे सांगू इच्छितो की, महायुतीमध्ये भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी आणि इतर लहान मित्र इतकेच सोबत आहोत, असं फडणवीस म्हणाले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!