महाराष्ट्र

Assembly Election : अजितदादांना अश्रू अनावर; ‘लाडक्या बहिणीं’नी दिला धीर

Ajit Pawar : म्हणाले, सुनेत्रा पवार यांना उभं करणं माझी चुक होती

Baramati : विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर महायुती आणि महाविकास आघाडीकडून उमेदवार निश्चित झाले आहेत. त्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचा एक दिवस शिल्लक असताना सोमवारी राज्यभरातील युती आणि आघाडीच्या उमेदवारांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील बारामती विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला. त्यानंतर पार पडलेल्या प्रचार सभेमध्ये बोलतांना अजित पवार यांना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले.

आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी

निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. ते बारामतीमध्ये आयोजित सभेत बोलत होते. दरम्यान यावेळी बोलताना अजित पवार चांगलेच भावुक झाले. सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांना उभं करणं माझी चुक होती. जो काम करतो त्याच्याकडून चुका होतात. मी मोठ्या मनानं माझी चूक कबूल करतो. मात्र आता कोणाचं चुकलं? पहिला फॉर्म मी भरणार होतो. आम्ही सगळे तात्यासाहेब पवारांची फॅमीली. आम्ही बिकट परिस्थितीमधून वर आलो. आईने आधार दिला. आईने सांगितलं माझ्या दादाविरोधात फॉर्म भरू नका. घरातील ज्येष्ठ व्यक्तींनी समजून सांगायला पाहिजे होतं. मात्र फॉर्म भरायला कोणी सांगितला तर मग साहेबांनी आमचं घर फोडलं का? आम्ही जीवाला जीव देणारी माणसे आहोत. एकोपा टिकवायला पिढ्यानपिढ्या जातात. परंतु तो तोडायला वेळ लागत नाही. असे सांगताच भर सभेमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अश्रू अनावर झाले. त्यांचा सामना सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांच्याशी होणार आहे.

अजित पवार यांच्या डोळ्यात स्टेजवर अश्रू आल्याचं दिसताच तिथे उपस्थित असलेल्या महिला कार्यकर्त्या देखील चांगल्याच भावुक झाल्या. दादा आता रडायचं नाही तर लढायचं अशी जोरदार घोषणाबाजी सभेसाठी आलेल्या या महिलांनी केली. ‘मी निवडणूक लढणार नव्हतो मात्र कार्यकर्त्यांचा आग्रह आणि महायुतीमध्ये ही जागा राष्ट्रवादीला सुटली’ असंही यावेळी अजित पवार यांनी म्हटलं आहे.

लाडकी बहीण योजना बंद पाडण्याच्या हालचाली – पवार 

लाडकी बहीण योजनेवरूनही पवारांनी विरोधकांवर निशाणा साधला. लाडकी बहिणींच्या खात्यात आचारसंहिता लागण्यापूर्वीच ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे जमा झाले आहेत, त्यांना पैसे मिळताच तर तुमच्या का? पोटात दुखते असा सवाल अजित पवार यांनी केला आहे. जर विरोधक सत्तेत आले तर लाडकी बहीण योजना बंद पाडण्याच्या हालचाली होऊ शकतता, योजनेसाठी पुन्हा आपलं सरकार आलं पाहिजे असंही यावेळी अजित पवार यांनी म्हटलं आहे.

Assembly Election :  अजित दादा पुन्हा भारावले

दादा रडायचं नाही लढायचं

यावेळी बोलतांना अजित पवार यांचा कंठ दाटून आला होता. काही काळ अजित पवार यांनी आपले भाषण थांबवले. त्यानंतर उपस्थित महिलांपैकी एका महिलेने उभे राहत दादा रडायचं नाही तुम्ही लढायचं आम्ही बहिणी तुमच्यासोबत आहोत, अशी आरोळी दिली. तर इतर कार्यकर्त्यांकडून देखील याठिकाणी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!