महाराष्ट्र

Shweta Mahale : फडणवीसांच्या उपस्थितीत महालेंचे शक्तीप्रदर्शन

Devendra Fadnavis : दुपारी रॅलीनंतर भरणार उमेदवारी अर्ज

Assembly Election : महायुतीच्या वतीने भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार म्हणून आमदार श्वेता महाले सोमवारी दुपारी चिखलीमधून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाले यांचे शक्तीप्रदर्शन होणार आहे. रॅली आणि सभेनंतर त्या उमेदवारी अर्ज दाखल करतील.

बुलढाणा जिल्ह्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवणार्‍या आमदार श्वेता महाले यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत आहेत. २८ ऑक्टोबरला चिखली येथे त्यांच्या प्रमुख उपस्थितीत श्वेता महाले उमेदवारी अर्ज दाखल करतील. यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्री प्रतापराव जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नाझेर काझी यांच्यासह महायुतीचे नेते याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत. महायुतीचे मोठे शक्ती प्रदर्शन या निमित्ताने होणार आहे.

भाजपच्या उमेदवार श्वेता महाले यांचा निवडणूक उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शहरातील खामगाव चौफुली येथून दुपारी १२ वाजता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. चिखली बसस्थानक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, जयस्तंभ चौकमार्गे ही रॅली राजा टॉवर परिसरात आल्यानंतर याठिकाणी सभा होईल. या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच शिवसेना नेते व केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. नाझेर काझी यांच्यासह महायुतीमधील घटक पक्षांचे जिल्हाध्यक्ष आणि नेते संबोधित करणार आहेत.

भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), पीपल्स रिपब्लिकन पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, रयत क्रांती संघटना यांसह महायुतीमधील सर्वच पक्षांचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महायुतीतर्फे करण्यात आले आहे. या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच शिवसेना नेते व केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. नाझेर काझी यांच्यासह महायुतीमधील घटक पक्षांचे जिल्हाध्यक्ष आणि नेते संबोधित करणार आहेत.

Assembly Election : देशमुख बॅकफुटवर जाताच सतीश शिंदेंची एन्ट्री! 

उपस्थित राहणार..

भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, रयत क्रांती संघटना यासह महायुतीमधील सर्वच पक्षांचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महायुतीच्यावतीने करण्यात आले आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार असल्यामुळे आ. श्वेता महाले यांनी पहिल्याच दिवशी प्रचारात आघाडी घेतल्याचे स्पष्ट होत असून, भारतीय जनता पक्षासाठी आ. महाले यांची जागा किती महत्त्वाची आहे हे देखील अधोरेखित झाले आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!