महाराष्ट्र

Assembly Election : पश्चिम नागपुरात भाजपचं चाललयं काय?

Nagpur : कोहळेंच्या चर्चेने वाढली अस्वस्थता; ऐनवेळी वेगळाच उमेदवार?

BJP : भाजपने अजूनही नागपूर मध्य आणि पश्चिम मतदारसंघात आपला उमेदवार जाहीर केला नाही. मध्य नागपुरात विद्यमान आमदार विकास कुंभारे आणि इच्छुक प्रवीण दटके यांचीच नावे चर्चेत आहेत. पण पश्चिमचे चित्र वेगळे आहे. अशात इच्छुकांमध्ये सुधाकर कोहळे यांच्या एन्ट्रीने भाजपमध्ये अस्वस्थता वाढली आहे. पण, ऐनवेळी वेगळाच उमेदवार देऊन सरप्राईज देण्याचे प्लानिंग भाजप नेते करीत आहेत, असे कळते.

भाजपचा गड 

पश्चिम नागपूर हा भाजपचाच गड होता. पण काँग्रेसचे विकास ठाकरे यांनी 2019 मध्ये तो काबीज केला. त्यानंतर त्यांनी यावर्षी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात लोकसभा लढवली. ते निवडणूक हरले पण गडकरींची आघाडी कमी केली. त्यामुळे ठाकरेंचं वजन आणखी वाढलेलं आहे. आता ते विधानसभेत पुन्हा एकदा रिंगणात आहेत. त्यांच्याविरुद्ध दमदार उमेदवार उभा करण्याशिवाय भाजपला पर्याय नाही. मात्र, इच्छुकांच्या गर्दीला पर्याय नसतो. यात दयाशंकर तिवारी, संदीप जोशी, माया इवनाते, नंदा जिचकार या माजी महापौरांचा समावेश आहे. याशिवाय जयप्रकाश गुप्ता, प्रगती पाटील, नरेश बरडे यांनीही तयारी केली आहे.

इच्छुकांची गर्दी झाल्यानेच भाजप नेत्यांपुढील पेच वाढला. अशात दोन दिवसांपूर्वी अचानक सुधाकर कोहळे यांचे नाव चर्चेत आले. कोहळे दक्षिण नागपूरचे आमदार होते. 2019 मध्ये त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. त्यानंतर त्यांच्याकडे जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली. पण, तरीही निवडणूक लढण्यासाठी त्यांनी नेत्यांकडे खूप प्रयत्न केले. मात्र आता दक्षिण नागपूर मिळणार नाही, हे स्पष्ट सांगण्यात आले. त्यांनी सावनेरसाठी प्रयत्न केले. पण तेथेही गणीत जमले नाही. अशात ‘पश्चिमसाठी कामाला लागा’ असं नेत्यांनी सांगितल्याचं कोहळे म्हणाले.

Ravikant Tupkar : काहींचा करेक्ट कार्यक्रम करणार!

इच्छुकांच्या यादीत कोहळेंच्या एन्ट्रीने सगळे अस्वस्थ झाले. त्यांचा मतदारसंघ दक्षिण नागपूर असताना पश्चिममधून लढण्याचा प्रश्नच येत नाही, असं भाजपचे इतर इच्छुक म्हणत आहेत. एवढेच नव्हे तर संदीप जोशी यांच्या समर्थनार्थ घोषणाही देण्यात आल्या. शनिवारी सकाळी संदीप जोशी यांच्या घरापुढे शेकडो कार्यकर्ते एकत्र आले. पण ‘पक्षाची लक्ष्मणरेषा ओलांडणार नाही. जो आदेश मिळेल तेच काम करणार’, असं संदीप जोशी म्हणाले.

इच्छुकांना सरप्राईज मिळणार?

पश्चिम नागपूरमधून लढणाऱ्या भाजपमधील इच्छुकांना सरप्राईज मिळण्याचीही शक्यता आहे. काँग्रेसचा एक मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करून विकास ठाकरेंच्या विरोधात लढण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. अर्थात ही केवळ चर्चा असून यात किती तथ्य आहे, हे लवकरच कळणार आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!