महाराष्ट्र

Imtiaz Jaleel : अकोला पश्चिममध्ये उमेदवार निश्चित

AIMIM : अकोला पूर्व, अमरावती, नागपूर मध्येही देणार लढा 

Assembly Election : भारतीय जनता पार्टीची दुसरी उमेदवार यादी जाहीर होताच एमआयएमने आपली उमेदवारांची यादी फायनल केली आहे. अकोला पूर्व आणि अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघ एमआयएमने उमेदवार देण्याचा निश्चय आता पक्का केला आहे. एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी ‘द लोकहित’शी बोलताना याबाबत स्पष्टपणे माहिती दिली. 

अकोला पश्चिम मधून उमेदवार

जलील म्हणाले की, अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात पक्षाकडून उमेदवार दिला जाणार आहे. अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघांमध्येही एमआयएम उमेदवार उतरवणार आहे. याशिवाय अमरावती विधानसभा मतदारसंघात देखील उमेदवाराचे नाव निश्चित करण्यात आले आहे. नागपूर मध्येही पक्ष विधानसभा निवडणूक लढेल असे जलील यांनी स्पष्ट केले. मात्र या सर्व मतदारसंघांमध्ये येत्या काही तासात उमेदवारांची नावे जाहीर केली जातील, असंही जलील यांनी स्पष्ट केलं.

द लोकहित’चे वृत्त खरे

काही मतदारसंघांमध्ये भाजपची यादी फायनल झाल्यानंतर एमआयएम उमेदवारांची नावे जाहीर करेल, अशा आशयाचे वृत्त ‘द लोकहित’ने प्रकाशित केले होते. हे वृत्त तंतोतंत खरे ठरले आहे. याशिवाय ‘द लोकहित’ने काँग्रेस नेते तथा माजी मंत्री सुनील केदार यांच्या पत्नी अनुजा केदार यांना उमेदवारी मिळेल हे वृत्तही दिले होते. त्यानुसार अनुजा केदार यांचे नाव उमेदवारांच्या यादीत आले आहे. इतकेच नव्हे तर भाजपचे मदन येरावार, डॉ. अशोक उइके, काँग्रेसचे जितेंद्र मोघे, राष्ट्रवादी काँग्रेसचे इंद्रनील नाईक यांचे नावही यादीत असेल, हे ‘द लोकहित’ने अगदी ठामपणे नमूद केले होते. हे सर्व वृत्त अगदी तंतोतंत खरे ठरत आहेत. त्यामुळे ‘द लोकहित’ची विश्वसनीयता सिद्ध झाली आहे.

अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे साजिद खान पठाण यांनाच उमेदवारी दिली, हे आता जवळपास निश्चित झाली आहे. साजिद खान यांना उमेदवारी दिल्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शहर प्रमुख राजेश मिश्रा हे उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. मिश्रा यांनी उमेदवारी दाखल केल्यास. अकोल्यामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गट विरुद्ध भाजप अशी थेट लढत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत राजेश मिश्रा हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नाही, यासाठी आता महायुतमधील काही नेते आणि महाविकास आघाडी दोघांकडूनही प्रयत्न केले जात आहेत.

Akola West : भाजपचा नेता एमआयएमच्या संपर्कात

राजेश मिश्रा हिंदुत्ववादी चेहरा

अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे राजेश मिश्रा हे एक प्रकारे हिंदुत्ववादी चेहरा म्हणून ओळखले जातात. अकोल्यात गेल्या काही महिन्यात निर्माण झालेल्या जातीय तणावानंतर आता मराठी मतदार महाविकास आघाडीकडे जाणार नाही, असे चित्र निर्माण झाले आहे. परंतु तरीही काँग्रेसला गैरहिंदू मतांची पक्की खात्री आहे. अशात शिवसेनेचे राजेश मिश्रा रिंगणात उतरल्यास काँग्रेस आणि भाजप दोघांचेही गणित बिघडेल यात शंकाच नाही.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!