Congress : विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात प्रदेश काँग्रेसच्या उमेदवारांची दूसरी यादी शुक्रवारी (ता. 25) जाहिर झाली. यात भंडारा -पवनी मतदारसंघात महाविकास आघाडीतर्फे पूजा ठवकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे काँग्रेस पक्षाचे खंदे कार्यकर्ते डावलून प्रदेशाध्यक्ष नाना पटोलें यांनी आपल्या स्वनिर्मित छावा संग्राम परिषदेच्या एका कार्यकर्त्याच्या सौभाग्यवतीला तिकीट दिल्याचा आरोप होऊ लागला आहे.
नाना पटोलेंना काँग्रेस पक्षापेक्षा आपल्या संघटनेवर अधिक प्रेम अधिक असल्याची ओरड सुरु झाली आहे. नानाच्या छावा संग्राम परिषदेचे खंदे कार्यकर्ते गणेश उर्फ बालू ठवकर नाना पटोलें यांच्या जवळचे मानले जातात.’जहां नाना वहां जाना’हे ब्रीद वाक्य गणेश ठवकर नेहमी पाळतात. त्याचाच फायदा ठवकर यांना झाला. माझी सून म्हणूनच नानांनी पूजा गणेश ठवकर यांना उमेदवारी दिली. यातून नानांचे कार्यकर्त्यांवरी प्रेम दिसुन आले. गणेश ठवकर यांना नानांचा डावा हात म्हणूनही ख्याती मिळाली आहे. 2019ची निवडणूक नानांच्या निर्णयाविरुद्ध मनसेकडून लवण्याची तयारी केली. याव्यतिरिक्त नानाद्रोह गणेश ठवकर यांच्यावर नाही.
काँग्रेसचा अंतर्गत विरोध
या सर्व घडामोडींत नाना पटोलें यांनी आपल्या छावा संग्राम सेनेच्या पदाधिकाऱ्याचा घरी तिकीट दिल्याने काँग्रेस कार्यकर्ते दुखावले असल्याचे सांगण्यात येत आहे. जिल्हातील काँग्रेसचे अनेक नेते नानाच्या या निर्णयाने नाराज झाले आहेत. सामूहिक राजीनामे देण्याच्या तयारीत असल्याचीही माहिती आहे. अनेक पदाधिकारी दिल्ली, मुंबईत फोन करून नाराजी व्यक्त करत आहेत. काहींनी तर ‘नाना हटाव काँग्रेस बचाव’ असा उघड मोर्चाही उघडला आहे.
नानांच प्रेम जातीवर ?
या सर्व घडामोडींत नाना पटोलेंचे स्वजातीवर प्रेम अधिक असल्याचीही ओरड सुरु झाली आहे. इतर दलित समाज नानांविरुद्ध उघड नाराजी व्यक्त करू लागले आहेत. नाना पटोलें दलितांच्या विरोधात असल्याचेही सांगितले जाते. या निवडणुकीत नानांना मतदान करणार नसल्याच्या पोस्ट वायरल होत आहेत.
नानांचे वाढले टेंशन
या सर्व घडामोडींत नाना पटोलें यांच टेंशन वाढलं आहे. काँग्रेसचे परंपरागत दलित समाजाचे मतं नानांपासून दुरावले असल्याची चर्चा रंगू लागली आहे. दुसरीकडे महायुतीचा उमेदवार लक्षात घेता नानांवर पुन्हा एकदा ‘डमी कॅंडिडेट’ दिल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे नाना पटोले यांना भंडारा विधानसभा मतदारसंघात आपला उमेदवार निवडून आणण्याची अग्निपरीक्षा द्यायची आहे. त्यात आता नाना पटोले कितवर यश मिळवतात, हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.