महाराष्ट्र

Assembly Election : शंभर रुपये की पाचशे..? स्टॅम्प पेपर हवा तरी कुठला ?

Stamp Paper : उमेदवारांच्या शपथपत्राबाबत प्रशासनामध्ये संभ्रम

Election Commission : निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आतापर्यंत 9 जणांनी अर्ज दाखल केले आहे. निवडणुकीतील प्रत्येक प्रक्रिया ‘रूल बूक’ प्रमाणे होते. मात्र उमेदवारांचे शपथपत्र कुठल्या स्टॅम्पपेपरवर हवे, याबाबत मात्र प्रशासनामध्येच संभ्रमाचे वातावरण आहे. दक्षिण नागपूरमधील सूचना पत्रकाचा नमुना 100 रुपयांचा तर उमरेडमध्ये 500 रुपयांचा उल्लेख आहे. त्यामुळे उमेदवारांना नेमका कितीचा स्टॅम्प पेपर घ्यावा, असा प्रश्न निर्माण झाा आहे.

शासनाने अलीकडे 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरऐवजी 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर व्यवहार करण्याचे आदेश दिलेले आहेत. 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीत उमेदवारांना शपथपत्राचे फॉर्मेट देण्यात आलेले आहे. परंतु सूचना पत्रकात काहींना शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर शपथपत्र मागितले तर काहींना पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर शपथपत्र मागितले आहे.

Ballarpur : मुनगंटीवार म्हणाले, राजनीतीपेक्षाही मोठी आहे राष्ट्रनीती !

संख्या वाढली 

शुक्रवारपासून (23 ऑक्टोबर) उमेदवारी अर्ज भरणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. 29 ऑक्टोबरपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे. अर्ज दाखल करताना शपथपत्रदेखील सादर करावे लागते. सरकारने नुकतीच 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरऐवजी 500 रुपयांच्या स्टॅम्पवर कारभार करण्याची अधिसूचना काढली. परंतु काही मतदारसंघात 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर शपथपत्र मागण्यात येत आहे. तर काही ठिकाणी 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरची मागणी होत आहे, अशी माहिती समोर आली आहे.

बसपा कडून तर अर्ज वाटपाबाबतदेखील आरोप करण्यात आला आहे. उमेदवारी अर्ज काही ठिकाणी मोफत देण्यात येत असून काही ठिकाणी पैशाची मागणी होत आहे. हिंगणा विधानसभेत एका अर्जासाठी 100 रुपयांची मागणी करण्यात आली. त्याची रीतसर पावती सुद्धा उमेदवाराला देण्यात आली, असा दावा बसपाचे माध्यम प्रभारी उत्तम शेवडे यांनी केला.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!