Political News : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाची यादी जाहीर झाली. त्यानंतर 24 ऑक्टोबरला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाची यादी जाहीर करण्यात आली आहे. यात 45 उमेदवारांचा समावेश आहे. निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादीतील काही लढती चर्चेचा विषय बनल्या आहेत. बारामतीमध्ये काका विरुद्ध पुतण्या तर अहेरीमध्ये बापाविरुद्ध लेक या लढती चर्चेत आल्या आहेत.
लढतींची चर्चा
विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 29 ऑक्टोबर आहे. त्यामुळे आता उमेदवारी जाहीर करण्यात येत आहेत. महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाची यादी 23 ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आली. तर महायुतीतील घटकपक्षाकडून याद्या जाहीर केल्या जात आहेत. दरम्यान 24 ऑक्टोबरला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाची यादी जाहीर करण्यात आली. त्यानंतर काही लढतींची चर्चा चांगलीच रंगली आहे.
45 उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर
महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार पक्षाची पहिली 45 उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये, शिवसेना ठाकरे गटाप्रमाणेच शरद पवारांनीही राष्ट्रवादीच्या अजित पवारांना तगडं आव्हान देण्यात आलं आहे. संपूर्ण राज्याचं लक्ष लागून असलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात थेट अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार म्हणजेच काका विरुद्ध पुतण्या अशी लढत होणार आहे. तर, अहेरी मतदारसंघात तर बाप विरुद्ध लेक असा सामना रंगणार आहे. मंत्री धर्मराव आत्राम यांच्याविरुद्ध त्यांच्या लेकीलाच शरद पवारांनी मैदानात उतरवलं आहे. त्यामुळे, महायुती विरुद्ध महाविकास आघाडीच्या लढाईत घड्याळाला तुतारीचं मोठं आव्हान निर्माण झालं आहे.
विशेष लक्ष
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही पक्षाच्या उमेदवारी याद्या जाहीर झाल्यानंतर अनेक काट्याच्या लढती होणार आहेत. काही लढतींकडे विशेष लक्ष लागले आहे. गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा क्षेत्र आहेत. त्यापैकीच एक म्हणजे अहेरी विधानसभा मतदारसंघ. या मतदारसंघाचे राजकीय दृष्टिकोनातून वेगळे महत्त्व आहे. त्यामुळे युती असो की आघाडी, या दोघांनीही अहेरी मतदारसंघावर लक्ष केंद्रित केलं आहे. पूर्वी गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे धर्मरावबाबा आत्राम असे समीकरण होते. मात्र, आत्राम यांनी आता अजित पवार गटात प्रवेश केल्यानंतर त्यांची कन्या भाग्यश्री आत्राम हलगेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला.
Ballarpur : मुनगंटीवार म्हणाले, राजनीतीपेक्षाही मोठी आहे राष्ट्रनीती !
आत्राम कुटुंबातील या फुटीमुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणं देखील पूर्णपणे बदलली आहेत. अखेर शरद पवारांच्या राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर झाली असून बाप विरुद्ध लेक असा सामना रंगणार आहे. तर, बारामती मतदारसंघातून युगेंद्र पवार यांना तिकीट देऊन अजित पवारांना मोठं आव्हान उभा केलंय. त्यामुळे, राज्याचं लक्ष या मतदारसंघातील लढतीकडे लागणार आहे.