Action By Officer’s : विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे. अशात गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यात 3 कोटी 91 लाख किंमतीचे सोने जप्त करण्यात आले आहे. 7 हजार 892 ग्रॅम सोने पोलीस संरक्षणात जिल्हा कोषागार कार्यालयात जमा करण्यात आले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्ह्यातील एकूण 3 हजार 841 पोस्टर्स हटविण्यात आले आहेत. 3हजार 259 बॅनर्स आणि 1 हजार 217 होर्डींग्जही काढण्यात आले आहेत. भारत निवडणूक आयोगाकडून आलेल्या आदेशांनंतर राज्यभरात प्रचार रॅली, मिरवणूक, सभेसाठी एक खिडकी परवानगी कक्ष सुरू करण्यात आले आहेत. विधानसभा मतदानाच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यादृष्टीने आता पोलिस विभागाचा सायबर सेल हा सोशल मीडियावर लक्ष ठेवून आहे. सोशल माध्यमांवर आक्षेपार्ह मजूकर शेअर केल्यास कारवाई होणार आहे. यासंदर्भात नागपुरात पोलिसांनी आदेश दिले आहेत.
नागपुरात पोलिसांची नजर
सोशल माध्यमातून कोणी चुकीचा संदेश फॉरवरर्ड केला अथवा दुसऱ्या सोशल माध्यमांवर शेअर केला तर तत्काळ कारवाई केली जाईल. पोलिस उपायुक्त लोहित मतानी यांनी ही माहिती दिली.
ग्रामीणभागातील प्रत्येक पोलीस ठाण्यापासून शहरातील पोलीस ठाण्यापर्यंत यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांचा एक कृतीगट ही कारवाई करेल, असे ते म्हणाले. नागपूर जिल्ह्यातील पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. सायबर सेल व गुप्त वार्ता विभागातील (SID) पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा प्रशिक्षण देण्यात आलं. त्या प्रशिक्षण सत्राला मतानी यांनी संबोधित केले.
बोलत होते. जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, सायबर सेलचे पोलिस निरीक्षक अमोल देशमुख आदी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
प्रत्येकाला अभिव्यक्ती आहे. पण तरी कायद्याचा भंग होणार नाही, याची जबाबदारी प्रत्येकावर आहे. खोट्या पोस्ट तयार करणे गुन्हा आहे. त्यातून समाजाची दिशाभूल होते. मजकुरात खाडाखोड करुन समाजात तेढ निर्माण केली जाते. त्यातून सामाजिक शांततेला बाधा पोहोचते. अशा प्रकारच्या पोस्ट, , मजकूर, चित्र व्हिडीओ आदि शेअर करणं कायद्यानुसार गुन्हा आहे. चुकीची पोस्ट जरी तयार केली नसली तरी ती शेअर केली तरी गुन्हा दाखल करावा, असं सांगण्यात आलं.
अशा प्रकारचा गुन्हा सोशल माध्यमांवर अथवा इतर माध्यमातून निर्देशनास आला, तर तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश पोलिस उपायुक्त मतानी यांनी दिले. प्रसंगी कोणी तक्रार करेल याची वाट पाहण्यात येऊ नये, असे ते म्हणाले. लोक प्रतिनिधित्व अधिनियम 1951 अनुसार आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. आचारसंहितेच्या अनुषंगाने अनेक बाबी अधिनियमात आहेत. प्रत्येक जिल्हा पातळीवर संनियत्रण समिती तयार करण्यात आली आहे. विधानसभेच्या कोणत्याही उमेदवाराला आपल्या प्रचारासाठी जे साहित्य वापरावयाचे आहे, त्याचे प्रमाणिकरण केले जाते, असे मतानी यांनी सांगितले.
कोणतेही साहित्य प्रचारासाठी वापरावयाचे असेल तर त्याची पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे. सायबर शाखा, जिल्हा माहिती कार्यालय, सर्व पोलिस स्थानक प्रमुख यांच्यावतीने सायबर कर्मचाऱ्यांची टीम लक्ष ठेवेल, अशी सूचना देण्यात आली. जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनीही एकत्रित पथकांच्या कामाची माहिती यावेळी दिली.